'कभी खुशी कभी गम'मध्ये आर्यन खानने केलंय काम; तुम्ही ओळखलं का त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:00 PM2021-12-10T12:00:00+5:302021-12-10T12:00:00+5:30

kabhi khushi kabhie gham: 'कभी खुशी कभी गम'च्या तगड्या स्टारकास्टमध्ये आर्यन खानचाही समावेश होता. या चित्रपटात आर्यनने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो. करणच्या चित्रपटांच्या यादीत असे काही सिनेमे आहेत जे गेल्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर-खान अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती.

हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखच्या लेकाने आर्यन खाननेदेखील काम केलं होतं. हे फार कमी जणांना माहित आहे.

'कभी खुशी कभी गम'च्या तगड्या स्टारकास्टमध्ये आर्यन खानचाही समावेश होता. या चित्रपटात आर्यनने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

मुळात या चित्रपटातील बालकलाकार म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर लड्डूची भूमिका साकारणार कविश मजुमदार किंवा शाहरुख- काजोलच्या मुलाची म्हणजेच ‘क्रिश रायचंद’ची भूमिका साकारणारा जिब्रान खान हे दोनच चेहरे येतात. परंतु, या दोघांव्यतिरिक्त आणखी एक बालकलाकार या चित्रपटात पाहायला मिळाला होता.

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील लहानपणीचा राहुल (शाहरुख खान) आठवतोय का तुम्हाला? चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात राहुलच्या बालपणीचा काळ दाखवण्यात आला आहे.

यात नंदिनी रायचंद (जया बच्चन) त्यांच्या मुलाशी म्हणजेच राहुलशी खेळतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे याच लहान राहुलची भूमिका शाहरुखचा लेक आर्यन खान याने साकारली आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून आर्यनने पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. परंतु, ही गोष्ट अनेकांना माहित नाही. इतकंच नाही तर अनेकदा आर्यनचं कलाविश्वात कधी पदार्पण होणार असा प्रश्न शाहरुखला विचारला जातो. मात्र, आर्यनला अभिनय क्षेत्रात रस नसल्याचं अलिकडेच किंग खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं.