Tina Datta : "मी ढसाढसा रडायला लागली"; 'या' अभिनेत्रीचा प्रेमात झाला विश्वासघात, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:01 IST2023-10-31T17:34:39+5:302023-10-31T18:01:18+5:30
Tina Datta : आपल्या अभिनयाने टीनाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टीना दत्ता ही टेलिव्हिजनवरची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने उतरन सीरियलमध्ये इच्छा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर ती बिग बॉस 16 मध्ये देखील पाहायला मिळाली.
बिग बॉसनंतर ती जय भानुशालीसह 'हम रहे ना हम' य़ा शोमध्ये दिसली. पण शो खूप दिवस काही चालला नाही. आता पिंकविलासोबत संवाद साधताना अभिनेत्रीने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
टीनाने म्हटलं की, "मी एक इमोशनल व्यक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीसोबत इमोशनली जोडली गेली असेल तर मग त्या नात्यातून मागे येणं माझ्यासाठी खूप कठीण होऊन जातं."
"मी मनापासून लोकांशी कनेक्ट होते पण यामुळे अनेकदा मला हलक्यात घेतलं जातं. एकदा एका व्यक्तीने अत्यंत वाईट पद्धतीने मन दुखावलं होतं."
"जर कोणी माझा विश्वासघात केला असेल तर मी त्या गोष्टीतून लवकर बाहेर येऊ शकत नाही. मला ते शक्यच होत नाही. एकदा मी गोव्याला गेली होती आणि तिथे योगा करत होती."
"माहीत नाही मला अचानक काय झालं मी ढसाढसा रडू लागली. मला अचानक काय झालं हे मलाच थोडा वेळ समजू शकलं नाही. पण खरंतर जेव्हा तुम्ही खूप इमोशनल होता तेव्हा असं होतं."
योगाने आयुष्यात पुढे जाण्याची संधी दिली. योगामुळेच ती स्वत:ला शारीरीक आणि मानसिकरित्या मजबूत करत आहे असंही टीनाने म्हटलं आहे. टीनाच्या अदांनी चाहते घायाळ होतात.
आपल्या अभिनयाने टीनाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीना सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.