IN PICS :‘या’ कलाकारांनी नाकारला होता ‘बाहुबली’, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:32 PM2021-12-28T17:32:41+5:302021-12-29T10:39:49+5:30

Actors Who Rejected The Roles In Baahubali : कदाचित सिनेमा सुद्धा नशिबातचं लिहिलेला असतो. असं नसतं तर ‘बाहुबली’ सारखा सिनेमा अनेक कलाकारांनी का नाकारला असता? कदाचित आज त्यांना सुद्धा या नकाराचा पश्चाताप होत असावा..?

हृतिक रोशनला म्हणे ‘बाहुबली’ या चित्रपटातील लीड रोल ऑफर झाला होता. पण चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या दोन अटींमुळे हृतिकने हा सिनेमा सोडला. होय, राजमौलींनी ऑफर दिली पण, कमिटमेंट मिळेपर्यंत सिनेमाची पूर्ण स्टोरी सांगण्यास नकार दिला. शिवाय हा सिनेमा पूर्ण होईपर्यंत दुसरा कुठलाही प्रोजेक्ट स्विकारता येणार नाही, ही सुद्धा त्यांची एक अट होती. राजमौलींनी कधी ही हृतिकने सिनेमा नाकारल्याची स्टोरी सांगिली नाही. प्रभास हाच माझी पहिली पसंत होता, असंच ते आत्ताही सांगतात. पण राजमौलींच्या अटींमुळे हृतिकने हा सिनेमा नाकारल्याचे मानले जाते.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहम याला म्हणे, राजमौलींनी भल्लालदेवची भूमिका ऑफर केली होती. त्याच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्टही पाठवली होती. त्यांनी म्हणे, अनेक दिवस प्रतीक्षा केली, पण जॉनकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे ही भूमिका राणा दुग्गुबतीच्या झोळीत पडली.

जॉनने भल्लालदेवची भूमिका नाकारल्यानंतर ही भूमिका विवेक ओबेरॉयला ऑफर झाल्याचीही चर्चा होती. पण विवेक अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे त्याने म्हणे ही भूमिका नाकारली.

ऐकून आश्चर्य वाटेल पण सोनम कपूर हिला सुद्धा या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. खुद्द सोनमने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये हा खुलासा केला होता. तिला म्हणे अवंतिकाची भूमिका देऊ केली होती. पण यासाठी 2 वर्षाची कमिटमेंट दिग्दर्शकाला हवी होती. साहजिकच सोनम यासाठी तयार नव्हती.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना बाहुबली या चित्रपटात शिवगामी देवीची भूमिका ऑफर केली गेली होती. काही रिपोर्टनुसार, तारखा नसल्यामुळे श्रीदेवींनी ही भूमिका नाकारली होती. तर काही रिपोर्टनुसार, श्रीदेवींनी या बदल्यात मोठ्या डिमांड केल्या होत्या. ज्या राजमौलींना मान्य नव्हता. श्रीदेवींनी नाकारल्यानंतर ही भूमिका रम्या कृष्णनला मिळाली.

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना कटप्पाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण त्यावेळी मोहनलाल यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी ही भूमिका नाकारली आणि नंतर ती सत्यराज यांच्याकडे गेली.

देवसेनाच्या भूमिकेत अनुष्का शेट्टी भाव खाऊन गेली. पण तिच्या आधी ही भूमिका साऊथ स्टार नयनतारा हिला ऑफर केली गेली होती. मात्र तिच्याकडे तारखा नसल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली.