7 new Indian shows and movies on Netflix, ZEE5
काहीही केल्या चुकवू नका या ७ वेबसिरिज, आहेत एकापेक्षा एक सरस By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:18 PM2020-06-05T18:18:13+5:302020-06-05T18:28:56+5:30Join usJoin usNext सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज या अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या वेबसिरिज चांगल्याच गाजल्या आहेत. आता अनुराग नेटफ्लिक्सवर चोक्डः पैसा बोलता है ही नवीन वेबसिरिज प्रेक्षकांसाठी घेऊन आला असून यात सैय्यामी खेर मुख्य भूमिकेत आहे. सय्यामी बँकेत काम करणारी स्त्री असून तिच्या पतीने खूप सारे कर्ज घेतले असल्याचे तिला कळते आणि त्यानंतर तिला घरात खूप सारा पैसा सापडतो. पण या सगळ्यात नोटबंदीची घोषणा होते. या सगळ्यात पुढे काय होते. ते या वेबसिरिजमध्ये लोकांना पाहायला मिळणार आहे. यात अमृता सुभाष देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चिंटू का बर्थडे या वेबसिरिजची कथा इराकमध्ये राहाणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते. अमेरिका आणि इराकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भारतात परतण्याचा हे कुटुंब प्रयत्न करत असते. त्याच काळात त्यांच्या सर्वात छोट्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा ते ठरवतात. त्यावेळी काही लोकांकडून त्यांना कशाप्रकारे मदत मिळते हे या वेबसिरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात विनय पाठक मुख्य भूमिकेत असून ही वेबसिरिज झी ५ ला पाहायला मिळणार आहे. कहने को हमसफर है या वेबसिरिजचे दोन सिझन आतापर्यंत गाजले आहे. आता याचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात रोहित रॉय, मोना सिंग, गुरदीप कोहली यांच्या मुख्य भूमिका आहेत. हे तिघेही त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले असल्याचे दुसऱ्या सिझनमध्ये दाखवले होते. पण तिसऱ्या सिझनमध्ये एका लग्नाच्या निमित्ताने हे तिघे समोरासमोर येणार असून ही वेबसिरिज झी ५ ला पाहायला मिळणार आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या एका आईची कथा काली सिझन २ मध्ये दाखवण्यात आली आहे. यात पाऊली डॅम, पाताल लोक फेम अभिषेक बॅनर्जी आणि विद्या मालवदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसिरिज झी ५ ला पाहायला मिळणार आहे. रक्तांचल हा एक क्राईम ड्रामा असून ही वेबसिरिज एम एक्स प्लेअरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना ऐंशीच्या दशकातील उत्तर प्रदेश मधील पूर्वांचलमधील एक कथा पाहायला मिळणार आहे. वसीम खान हा माफिया आणि विजय सिंग नावाचा एक गुन्हेगार यांच्या अवतीभवती ही कथा फिरणार आहे. काही सत्य घटनांवर आधारित ही वेबसिरिज आहे. लॉक्ड या वेबसिरिजमध्ये काही लोक, त्याच्यात काही दरोडेखोर देखील असतात ते एका घरामध्ये लॉक्ड होतात. या सगळ्यामागे एक मास्टर माईंड असतो. एकाच घरात असलेल्या लोकांचे पुढे काय होते हे या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळेल. ही वेबसिरिज तेलगू भाषेत असली तरी इंग्रजी सबटायटलच्या मदतीने तुम्ही ती पाहू शकता. रन हा एक तेलगू चित्रपट असून एका अतिशय आनंदी कुटुंबाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या कुटुंबातील महिला अचानक आत्महत्या करते आणि तिने आत्महत्या केली नसून हत्या केली असा सगळ्यांचा दावा असतो आणि या नायकानेच पत्नीचा खुन केला असा पोलिसांना संशय असतो. त्याच्यासोबतच आणखी सहा जणांवर पोलिस संशय घेतात. त्या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, तिचा खून कोणी केला अशा अनेक प्रश्नाची उत्तर तुम्हाला रन मध्ये मिळतील. या चित्रपटाला देखील इंग्रजी सबटायटल आहेत. टॅग्स :रोनित रॉयअमृता सुभाषसंयमी खेरRonit RoyAmrita SubhashSaiyami Kher