Allu Arjun : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ८ खास गोष्टी, ज्या केवळ त्याच्या डायहार्ट फॅन्सलाच माहीत असतील! By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:23 PM 2022-02-02T15:23:53+5:30 2022-02-02T15:57:51+5:30
Allu Arjun Interesting Facts : अल्लू अर्जुन फक्त त्याच्या कामासाठीच नाही तर त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. ज्यामुळे फॅन्सच्या मनात त्याच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. 'स्टायलिश स्टार' (Stylish Star) म्हणून प्रसिद्ध असलेल्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा आज घराघरात लोकप्रिय झाला आहे. आधी फक्त साऊथमध्ये लोकप्रिय असलेला हा अभिनेता 'पुष्पा'च्या यशानंतर देशभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अल्लू अर्जुन फक्त त्याच्या कामासाठीच नाही तर त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. ज्यामुळे फॅन्सच्या मनात त्याच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुनच्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
१) अल्लू अर्जुनने १६ वर्षांचा असताना २००२ मध्ये 'गंगोत्री' सिनेमातून अभिनयाला टेक्निकली सुरूवात केली होती. पण तसं त्याने 'विजेता' या सिनेमात तो ३ वर्षांचा असताना काम केलं होतं. हा सिनेमा १९८५ मध्ये आला होता.
२) अल्लू अर्जुन हा एक जबरदस्त डान्सर म्हणूनही लोकप्रिय आहे. तो बालपणी जिमनॅस्ट करत होता. हे त्याच्या अधिक फ्लेक्झिबल असण्याचं कारण आहे. जे त्याच्या डान्समधून दिसतं.
3) त्याचे टोपण नाव बन्नी आहे. त्यामुळे त्याला त्याच्या जवळचे लोक त्याला बन्नी म्हणूनच हाक मारतात. सोबतच त्याचे फॅन्सही त्याला बन्नीच म्हणतात.
४) त्याचा सर्वात आवडता सिनेमा त्याच्या मामाची म्हणजे चिरंजीवी मुख्य भूमिका असलेला 'इंद्रा' हा आहे. हा सिनेमा त्याने आतापर्यंत १५ पेक्षा जास्त वेळ पाहिला आहे. जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो हा सिनेमा बघतो.
५) जेव्हा तो कामात बिझी नसतो तेव्हा त्याला वाचन करायला फार आवडतं. त्याचं आवडतं पुस्तक Who Moved My Cheese हे आहे.
६) दरवर्षी आपल्या वाढदिवसाला स्टायलिश स्टार ब्लड डोनेशन ड्राइव्हचं आयोजन करतो. इतकंच नाही तर तो यात स्वत:ही रक्तदान करतो.
७) अल्लू अर्जुनला केवळ अभियन आणि डान्सचीच नाही तर फोटोग्राफी व स्केचिंगचीही आवड आहे. दोन्ही कामात तो तरबेज आहे.
८) अल्लू अर्जुनच्या आत्याने चिरंजीवी यांच्यासोबत लग्न केलं आहे. या नात्याने चिरंजीवी त्याचे मामाजी लागतात आणि सुपरस्टार राम चरण हा त्याचा आतेभाऊ आहे.