आता कशा दिसतात ९०चा काळ गाजवणाऱ्या या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री, लेटेस्ट फोटो बघून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:10 PM2022-03-11T12:10:47+5:302022-03-11T12:35:24+5:30

90s Bollywood Actress Then and Now : ९०च्या दशकात ज्या हिरोईन एकापाठी एक सिनेमे करत होत्या त्या आता पडद्यावरून गायब आहेत. अनेकांना तर माहीत नाही की एक काळ गाजवणाऱ्या हिरोईन आता कशा दिसतात.

90s Bollywood Actress Then and Now : बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचा काम करण्याचा काळ जरा हिरोंपेक्षा कमी असतो. आता जरा हा पॅटर्न बदलला आहे. आधी तर हिरोईनचं लग्न झालं तर त्यांचं करिअर संपत होतं. हेच कारण आहे की, ९०च्या दशकात ज्या हिरोईन एकापाठी एक सिनेमे करत होत्या त्या आता पडद्यावरून गायब आहेत. अनेकांना तर माहीत नाही की एक काळ गाजवणाऱ्या हिरोईन आता कशा दिसतात. अशात आम्ही तुमच्यासाठी ९०चा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींचे लेटेस्ट फोटो घेऊन आलो आहोत.

आयशा जुल्का (Aayesha Julka) - 'जो जीता वही सिकंदर' आणि 'खिलाड़ी' सारख्या सिनेमात काम केलेली आयशा जुल्काने बॉलिवूडसोबतच तेलुगु आणि कन्नड भाषेतील सिनेमातही काम केलं आहे.

अनु अग्रवाल (Anu Agrawal) - 'आशिकी' हा अनु अग्रवालचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा आणि यातील गाणी सुपरहिट झाली होती. अनुचं कामही पसंत केलं गेलं होतं. त्यानंतर ती कोणत्याही मोठ्या सिनेमात दिसली नाही. आज ती इंडस्ट्रीपासून दूर आहे.

नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) - नम्रता शिरोडकरने मोजक्याच बॉलिवूड सिनेमात काम केलं. तिने साऊथमध्येही काही सिनेमात काम केलं. 'वास्तव', 'पुकार', आणि 'जब प्यार किसी से होता है' सारख्या सिनेमातील तिचं काम पसंत केलं गेलं होतं. नंतर तिने साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं.

किमी काटकर (Kimi Katkar) - जुम्मा चुम्मा दे दे... गाणं तर आठवत असेलच ना...या गाण्याने किमी काटकरला फेमस केलं होतं. त्यानंतर मात्र, ती जास्त सिनेमात दिसली नाही. नंतर तिने फोटोग्राफर शांतनु गौरीसोबत लग्न केलं.

फराह नाज़ (Farah Naaj) - तब्बूची मोठी बहीण फराहने अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं. ती टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. सनी देओल, आमिर खान, ऋषि कपूर, अनिल कपूर, जैकी श्रॉफ आणि मिथुन चक्रवर्ती सारख्या मोठ्या स्टार्ससोबत तिने काम केलं होतं. आता ती इंडस्ट्रीपासून दूर आहे.

मीनाक्षी शेषाद्रि (Minakshi Sheshadri) - घातक, घायल , दामिनीसारख्या गाजलेल्या सिनेमात मिनाक्षीने दमदार काम केलं होतं. त्यावेळी सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जात होतं. त्यानंतर तिने लग्न केलं आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली.

ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) - ममता कुलकर्णी ने 'बाजी', 'नसीब', 'करण अर्जुन' आणि 'आशिक आवारा' सहीत अनेक हिट सिनेमात काम केलं. ती अनेकदा वादातही सापडली होती. नंतर ती साध्वी बनली गायब झाली. नंतर ती ड्रग्स वादातही सापडली होती.

रंभा (Rambha) - ९० च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती, जिला तुम्ही सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात पाहिले असेल. ती साऊथची अभिनेत्री होती, पण ती ९० आणि २००० च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप सक्रिय होती. आम्ही बोलतोय अभिनेत्री रंभा बाबत. रंभाने घरवाली बहरवाली, क्रोध, बेटी नंबर 1, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, जानी दुश्मन सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते.

शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) - शिल्पा शिरोडकरने बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने तेव्हाच्या जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. आता ती इंडस्ट्रीत सक्रिय नाही.

मधु - 'फूल और कांटे' सिनेमातून गाजलेल्या मधुनेही नंतर अनेक सिनेमात काम केलं. दिलजलेमधीलही तिची भूमिका पसंत केली गेली होती. पण नंतर तिचं लग्न झालं आणि ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.