Happy Birthday A R rahman : दिलीप कुमार हे नाव बदलून स्वीकारला इस्लाम धर्म; रहमान यांच्या आयुष्यातील किस्से By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:58 AM 2023-01-06T10:58:42+5:30 2023-01-06T11:06:32+5:30
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा ५६ वा वाढदिवस. रहमान यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय गाणी दिली आणि आजही देत आहेत. रोजा चा अल्बम असो किंवा बॉम्बे ची गाणी किंवा ताल चित्रपटातील संगीत,तर आजच्या काळातील रॉकस्टारचं संगीत असो त्यांच्या गाण्यांनी चाहते मंत्रमुग्ध होतात. पण तुम्हाला माहित आहे का त्यांचे नाव रहमान हे त्यांचे जन्मनाव नाही. त्यांना संगीतक्षेत्रात पहिला ब्रेक कोणी दिला यासोबतच त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो बघुया ए आर रहमान यांचं खरं नाव दिलीप कुमार होतं. त्यांचा जन्म हिंदू परिवारात झाला. लहानपणी त्यांच्या बहिणीची तब्येत बिघडली तेव्हा एका सूफी संताने तिला बरे केले. याच घटनेनंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आणि ए आर रहमान यांचा जन्म झाला.
त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट अशी की रहमान यांना कधीच संगीत क्षेत्रात यायचे नव्हते. त्यांनी खरं तर कम्प्युटर इंजिनिअर व्हायचे होते.
ए आर रहमान यांनी नोट्स ऑफ द ड्रीम्स या आत्मचरित्रात एका धक्कादायक बाबीचा खुलासा केला होता. वयाच्या २५ वर्षापर्यंत ते स्वत:ला अपयशी समजायचे. त्यांच्या डोक्यात नेहमी आत्महत्येचा विचार यायचा.
ए आर रहमान हे एवढे लोकप्रिय आहेत की कॅनडा येथील एका रस्त्याचे नाव ए आर रहमान असे ठेवण्यात आले आहे. २०१३ मध्ये हे कॅनडातील मर्खम ओंटारियो मधील रस्त्याला अल्लाह रहमान स्ट्रीट असे नाव देण्यात आले.
रहमान पहिले भारतीय आहेत ज्यांना २००९ साली ऑस्कर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.स्लमडॉग मिलेनिअर या सिनेमाच्या संगीतासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. 'जय हो' हे त्यातलं गाणं तुफान गाजलं. आजही हे गाणं अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात ऐकलं जातं.
जय हो हे गाणं खरं तर आधी सलमान खानच्या युवराज या चित्रपटासाठी कंपोझ केलं होतं हे फार कमी लोकांना माहित असेल. सलमान आणि रहमान यांच्यातील वादही चांगलाच गाजला होता. सलमानने रहमान यांना सुमार संगीतकार असे म्हणले होते. यावर सलमानचा सिनेमा आवडला तरच त्यासाठी काम करेन अशी रहमानने प्रतिक्रिया दिली होती.
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मनीरत्नम यांनी ए आर रहमान यांच्यातील टॅलेंट ओळखलं आणि रहमान यांना रोजा या सिनेमात संधी दिली. रोजा सिनेमातील त्यांच्या गाण्यांनी तर आजही अंगावर शहारा येतो.
रहमान यांनी लहानपणी दूरदर्शनच्या वंडर बलून या लोकप्रिय शो मध्ये सहभाग घेतला. रहमान यांना या शोमधून लोकप्रियचा मिळाली. ४ कीबोर्ड एकाच वेळी वाजवण्याचे टॅलेंट त्यांच्याकडे होते.
ए आर रहमान यांना २ ग्रॅमी अवॉर्ड्स, बाफ्टा अवॉर्ड.गोल्डन ग्लोब, ४ राष्ट्रीय पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार आणि १४ दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.