Akshay Kumar Twinkle Khanna : अक्षयसमोर आमिर खानचे काहीच चालले नाही आणि अक्षय-ट्विंकलचे लग्न झाले, काय आहे नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:02 AM2023-01-10T09:02:15+5:302023-01-10T11:23:10+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का ट्विंकलने लग्नाना असाच होकार दिला नव्हता तर एक अट ठेवली होती.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना म्हणजे बॉलिवूडमधलं आदर्श कपल. दोघांचीही जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम वेळोवेळी दिसून आले आहे.

बी टाऊनमध्ये अक्षयची जादू आजही कायम आहे तर ट्विंकल खन्नाने लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद केले. लग्नानंतर ती संसारातच रमली. तिने दोन मुलांना जन्म दिला. आज ती निर्माती आणि उत्तम लेखिका आहे.

पण ट्विंकल आणि अक्षयच्या लग्नाआधी ट्विंकल सिनेमांमध्ये काम करत होती आणि एक यशस्वी अभिनेत्री होती. मग असं काय झालं की तिने एक विशिष्ट अट ठेवत अक्षयशी लग्नाला होकार दिला बघुया.

ट्विंकल आणि आमिर खानचा 'मेला' हा चित्रपट आठवत असेलच. या सिनेमाला प्रेक्षकांनी फार काही प्रतिसाद दिला नाही आणि सिनेमा दणकून आपटला. पण यामुळे अक्षय आणि ट्विंकलचं मात्र लग्न झालं

अक्षय कुमार २००० पासूनच ट्विंकलवर फिदा होता आणि त्याला तिच्याशी लग्न देखील करायचे होते. मेला सिनेमा रिलीज व्हायच्या आधी अक्षयने ही इच्छा ट्विंकलसमोर बोलून दाखवली होती.

मग काय अक्षय आणि ट्विंकलमध्ये एक पैज लागली. मेला सिनेमा जर हिट झाला तर ट्विंकल लग्न करणार नाही आणि सिनेमा फ्लॉप झाला तर ती लग्न करायला होकार देईल. झालं तर चित्रपट फ्लॉप झाला पण अक्षयला त्याची ट्विंकल मिळाली.

मेला या सिनेमात आमिर खान मुख्य अभिनेता होता. हा चित्रपट चालेल अशी आमिरला खात्री होती मात्र घडले वेगळेच. मेला चित्रपट १८ कोटींच्या बजेटमध्ये बनवा होता आणि वास्तविक सिनेमाने केवळ २५ कोटींचीच कमाई केली.

अक्षय कुमारला फक्त ट्विंकलचीच मनधरणी करावी लागली नाही तर त्याला ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांना देखील विश्वासात घ्यायचे होते. इतकंच नाही तर डिंपल कपाडिया यांनी देखील अक्षयसमोर एक अट ठेवली होती.

डिंपल यांनी सांगितले होते, तु्म्हाला लग्नाआधी एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं लागेल. जर सगळं काही व्यवस्थित असेल तरच त्यांनी नंतर लग्नाचा निर्णय घ्यावा.

अक्षय आणि ट्विंकल यांनी डिंपल कपाडिया यांचे ऐकले. कोणालाही निराश न करता अक्षयने आपले प्रेम टिकवले. नंतर १७ जानेवारी २००१ रोजी अक्षय आणि डिंपल लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर एका वर्षातच म्हणजे २००२ मध्ये ट्विंकलने 'आरव' या मुलाला जन्म दिला. तर २०१२ मध्ये त्यांना मुलगी झाली. तिचे नाव नितारा ठेवण्यात आले.