IN PICS : कुठेही गेला तरी आमिर खानच्या हातात का दिसते ‘उशी’? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:00 AM2022-12-10T08:00:00+5:302022-12-10T08:00:02+5:30

Aamir Khan : बॉलिवूड स्टार्सचा एअरपोर्ट लूक हा चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच अनेक स्टार्स आकर्षक स्टाईल व गेटअपमध्ये प्रवास करताना दिसतात. पण आमिर खान मात्र याला अपवाद म्हणायला हवा.

बॉलिवूड स्टार्सचा एअरपोर्ट लूक हा चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच अनेक स्टार्स आकर्षक स्टाईल व गेटअपमध्ये प्रवास करताना दिसतात. पण आमिर खान मात्र याला अपवाद म्हणायला हवा.

होय, एअरपोर्टवर आमिरचा स्टाईलिश लूक नाही तर त्याच्या हातातील पिलो अर्थात उशी अधिक लक्ष वेधून घेते. होय, आमिर कुठेही जावो, त्याची उशी त्याच्यासोबत असते.

व्हॅकेशन असो वा आऊटडोअर शूटींग उशी घेतल्याशिवाय आमिर घराबाहेरच पडत नाही. अगदी उशी हातात घेऊन तो प्रवास करतो. आता ही खास उशी सतत सोबत बाळगण्याचं कारण काय, तर झोप.

होय, आमिर खान आपल्या कामात जसा परफेक्शनिस्ट आहे, तसाच आपल्या झोपेच्या बाबतीतही त्याला तडजोड मान्य नाही.

योग्य, आरामदायक उशी नसेल तर आमिरला झोप येत नाही. त्यामुळे आमिर सतत आपली नेहमीची उशी सोबत बाळगतो. दूरच्या प्रवासात ही उशी त्याच्या सतत सोबत असते.

आमिरचं हे ‘उशी प्रेम’ बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही चांगलंच ठाऊक आहे. आमिरच्या 55 व्या वाढदिवशी करिनाने त्याचा त्याच्या आवडत्या उशीसोबतचा फोटो शेअर केला होता.

करिनाने शेअर केलेला आमिरचा उशीसोबतचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. माझ्या आवडत्या को-स्टार आमिरची उशी..., असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा नुकताच रिलीज झालेला सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर आमिर मोठ्या ब्रेकवर आहे. अद्याप तरी त्याने कुठल्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.

सध्या मी काहीच करत नाहीये. सध्या मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. वर्षभरानंतर मी अभिनयात वापसी करेल, असं अलीकडे त्याने सांगितलं.

अर्थात काल शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘सलाम वेन्की’ या सिनेमात आमिर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात काजोल लीड रोलमध्ये आहे.