IN PICS : आमिर एकटा नाही, याआधी या सेलिब्रिटींचंही मोडलं दुसरं लग्न! By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 05:18 PM 2021-07-04T17:18:33+5:30 2021-07-04T17:41:27+5:30
आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. अर्थात दुसरं लग्न मोडणारा आमिर बॉलिवूडमध्ये एकटा नाही... आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. अर्थात दुसरं लग्न मोडणारा आमिर बॉलिवूडमध्ये एकटा नाही...
अभिनेत्री विद्या बालन आणि फिल्म निमार्ता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. दरम्यान सिद्धार्थचं हे तिसरं लग्न आहे. आधी त्याची दोन्ही लग्नं मोडली होती.
मान्यता दत्तच्या आधी संजय दत्तची दोन वेळा लग्नं झाली होती. त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा ही होती. पण तिच्या निधनानंतर त्याने रिया पिल्लईशी लग्न केलं होतं. पण काही काळातच त्यांनी घटस्फोट घेतला.
अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने बिपाशा बासूसोबत तिसरं लग्नं केलं आहे. याआधी त्याचं श्रद्धा आणि जेनीफर विंगेट यांच्याशी लग्न झालं होतं.
कमल हसनचं पहिलं लग्नं क्लासिकल सिंगर वाणी गणपतीसोबत झालं होतं. त्यानंतर त्याने सारिका हिच्याशी विवाह केला. पण तेही लग्न फार काळ टिकलं नाही.
दिग्दर्शक अनुराग कश्यपचं पहिलं लग्नं आरती बजाजसोबत झालं होतं. पण ते विभक्त झाले. यानंतर त्याने कल्की कोच्लिनसोबत विवाह केला पण काही काळातच तेही वेगळे झाले.
अभिनेत्री नीलिमा अजीम यांनी तीन लग्नं केलीत. पहिलं लग्न पंकज कपूर यांच्याशी, दुसरं राजेश खट्टरशी. ही दोन्ही लग्न अपयशी ठरल्यावर रजा अली खानसोबत त्यांनी तिसरं लग्न केलं. ते सुद्धा मोडलं.
फिल्म निमार्ता विधु विनोद चोपड़ाने सिने पत्रकार अनुपमा चोप्रासोबत तिसरं लग्न केलं आहे. पण याआधी त्याचं दोनदा लग्न झालं होतं
कबीर बेदी यांनी डान्सर प्रोतिमासोबत पहिलं लग्न केलं. दोघांचा घटस्फोट झाल्यावर अमेरिकन मॉडेल सुसैनसोबत दुसºयांदा लग्नगाठ बांधली. यानंतर टीव्ही प्रेजेंटर निक्कीसोबत तिसरं लग्न केलं. हे नातं तुटलं. 2005 मध्ये त्यांनी परवीन दुसांजसोबत चौथ्यांदा लग्नं केलं.