आयरा खानने शेअर केले हनीमुनचे फोटो, 'या' ठिकाणी करतायेत Enjoy
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:39 IST2024-02-04T16:11:20+5:302024-02-04T16:39:27+5:30
आमीरची मुलगी आयरा खानचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात विवाह पार पडला. आता आयरा आणि नुपूर त्यांच्या हनीमूनच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत.
फोटोंमध्ये नुपूर आणि आयरा सध्या एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून आले.
वैवाहिक जीवनाचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे.
आयरचा नवरा नुपूर हा फिटनेस ट्रेनर असून त्याला व्यायामाची खूप आवड आहे.
आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा पाहायला मिळत आहे.
रिपोर्टनुसार, आयरा आणि नुपूर आपल्या हनीमून ट्रीपसाठी इंडोनेशिया गेले आहेत.
नुपूरचा कुल अंदाज पाहताच चाहतेही फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतायेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला रजिस्टर मॅरेज केलं होतं. यानंतर 10 जानेवारी रोजी उदयपूर येथे शाही विवाह झाला.
लग्नानंतर या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.