कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:53 AM2022-01-05T11:53:03+5:302022-01-05T11:57:10+5:30

Aamir khan: आमिर खान आतापर्यंत ६१ चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे यातील त्याचे अनेक चित्रपट सुपहिट झाले आहेत.

'थ्री इडियट्स', 'लगान,'दंगल', 'पीके' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणजे आमिर खान.

वर्षातून एक किंवा दोन चित्रपट करणारा आमिर कलाविश्वातील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे कलाविश्वातील परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता कमाईच्या बाबतीतही परफेक्ट असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि रायटर अशा विविध भूमिका पार पाडणारा आमिर आज कोट्यावधींची कमाई करतो.

आमिर खानची एकूण कमाई किंवा त्यांची संपत्ती किती आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर एका चित्रपटासाठी ५० ते ६० कोटी रुपये मानधन घेतो. तसंच तो स्वत: देखील चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती करतो.

चित्रपटांव्यतिरिक्त आमिरला जाहिरातींमधूनही पैसे मिळतात. तो एका जाहिरातीसाठी १०- १२ कोटी रुपये घेतो. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने केवळ जाहिरातींमधून वर्षाला १३० कोटींची कमाई केली आहे.

आमिर मुंबईतील उच्चभू वस्तीत राहत असून त्याच्या घराची किंमत १८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.आमिरने अनेक प्रॉपर्टीजमध्ये आर्थिक गुंतवणूक केली आहे.

आमिरला गाड्यांची विशेष आवड असून त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस, फोर्ड यांसारख्या गाड्या आहेत. त्यांची किंमत जवळपास १५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

आज आमिरची एकूण संपत्ती१५६२ कोटी रुपये आहेत. कोणत्याही चित्रपट हिट झाल्यानंतर आमिर मिळालेल्या कमाईचा अर्धा भाग घेतो.

आमिर खान आतापर्यंत ६१ चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे यातील त्याचे अनेक चित्रपट सुपहिट झाले आहेत. त्यातच लवकरच त्याचा लालसिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य: अवि गोवारीकर इन्स्टाग्राम पेज)