१ तास ४८ मिनिटांचा हा कौटुंबिक हिंदी सिनेमा, शेवट पाहून बसेल धक्का! 'फिल्मफेअर' पुरस्काराचा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:44 IST2025-01-24T17:24:31+5:302025-01-24T17:44:25+5:30
हा हलक्याफुलक्या विषयावरचा कौटुंबिक सिनेमा पाहून तुम्ही आनंदी व्हाल पण शेवट बघून धक्काही बसेल

संजय मिश्रांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २०१३ साली रिलीज झालेला. हा सिनेमा चांगलाच गाजलेला.
या खास सिनेमाचं नाव 'आँखो देखी'. २०१३ साली फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कारने या सिनेमाला सन्मानित करण्यात आले होते.
'आँखो देखी' सिनेमात दिल्लीत राहणाऱ्या मध्यवर्गीय कुटुंबाची गोष्ट दिसते. सिनेमात संजय मिश्रांनी बाऊजी हे मुख्य पात्र साकारलं आहे
जेव्हा एका घटनेवरुन 'जे मी डोळ्यांनी पाहणार तेच सत्य', असं बाऊजी ठरवतात. त्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट पाहायला मिळते.
'आँखो देखी'मध्ये एकत्र कुटुंब हळूहळू कसं कमी होत चाललंय. याशिवाय जागेच्या अडचणीवरुन भावंडांमध्ये कसा दुरावा निर्माण होतो हे बघायला मिळतं
हा सिनेमा निखळ मनोरंजन करणारा हलकाफुलका कौटुंबिक सिनेमा आहे. पण सिनेमाचा शेवट पाहून मात्र आपल्याला चांगलाच धक्का बसतो
प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर हा सिनेमा उपलब्ध आहे. संजय मिश्रा, सीमा पाहवा, सौरभ शुक्ला या कलाकारांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती.