या खास ठिकाणी बर्थडे निमित्त अभिनवने रुबिनाला दिलं सरप्राइज, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:26 PM2024-08-27T15:26:59+5:302024-08-27T15:39:44+5:30

रुबिनाच्या वाढदिवशी ती तिच्या पतीसोबत एका खास ठिकाणी भटकंती करायला गेली आहे

रुबिना डिलैक ही बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रुबिना सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रुबिना डिलैक सध्या तिचा पती आणि कुटुंबासोबत फिरायला गेली आहे. रुबिनासोबत तिचा पती अभिनव शुक्ला पाहायला मिळतो

रुबिना डिलैक तिच्या पतीसोबत श्रीलंकेत समुद्रकिनारी फिरायला गेली असून रुबिना-अभिनवचे बीच वॅकेशनचे फोटो सध्या चर्चेत आहेत

रुबिना आणि अभिनवने रोमँटिक अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांची पसंती मिळवली आहे. रुबिना फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

रुबिनाच्या बर्थडे निमित्त अभिनवने श्रीलंकेच्या समुद्रकिनारी खास प्लॅन आयोजित केलेला दिसला. याशिवाय निसर्गरम्य सानिध्यात हॉटेल बूक केलेलं दिसलं

सध्या रुबिना अभिनय क्षेत्रापासून दूर तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. रुबिनाला पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतील यात शंका नाबी

रुबिना आणि अभिनव यांना काहीच दिवसांपूर्वी आई-बाबा झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांना जुळी मुलं झाली आहेत