तीन अभिनेते, दिग्गज क्रिकेटपटूसोबत अफेअर, वयाच्या पन्नाशीतही अविवाहित आहे 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:07 PM2024-08-27T14:07:10+5:302024-08-27T14:13:53+5:30

सलमान खानसोबत केलं पदार्पण, आता राजकारणातच दिसते ही अभिनेत्री

एकेकाळी सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री नंतर वैयक्तिक आयुष्यामुळे वादात अडकली. तीन अभिनेत्यांसोबत अफेअर, प्रसिद्ध क्रिकेटपटूसोबतही तिचं नाव जोडलं गेलं.

आज अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षीही अविवाहित आहे.साऊथसोबत हिंदीत अभिनय केल्यानंतर तिने राजकारणातही एन्ट्री केली. कोण आहे ही अभिनेत्री?

नगमाचा जन्म 1974 साली मुंबईतच झाला. 1990 साली सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री आहे नगमा. तेलुगू, तमिळ , मल्याळम, भोजपुरी, कन्नड, बंगाली आणि पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये तिने काम केलं.

इतकंच नाही तर तिने 2007 साली आलेल्या 'थांब लक्ष्मी थांब' या मराठी सिनेमातही भूमिका साकारली होती. यामध्ये रमेश भाटकर, आनंद अभ्यंकर, जयवंत वाडकर, अंजली उजवणे यांचीही भूमिका होती.

नगमाचं करिअर जोरात सुरु असतानाच ती वैयक्तिक आयुष्यामुळे सारखीच चर्चेत येत राहिली. सुरुवातीला भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबत तिच्या अफेअरची चर्चा होती. तेव्हा रवी किशन विवाहित होते आणि चार मुलांचे वडील होते. मात्र तेही नगमाच्या प्रेमात पडले.

रवी किशन यांच्यासोबतचं तिचं नातं फार काळ टिकलं नाही. नंतर नगमाचं नाव क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत जोडलं गेलं. 2001 साली दोघांच्या अफेअरची चर्चा झाली. मात्र त्यांनी कधीच सार्वजनिकरित्या नातं स्वीकारलं नाही कारण तेव्हा सौरव गांगुलीही विवाहित होता.

नगमा आयुष्यात नंतर साऊथ अभिनेता सरथ कुमारची एन्ट्री झाली. मात्र तेव्हा तोही विवाहित होता. त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर सरथ कुमारच्या पत्नीने खूप हंगामा केला होता. यामुळेच नगमा पुन्हा एकटी पडली.

शेवटी नगमा आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा झाली. मात्र नंतर तिने स्पष्ट केलं की ते फक्त एका सिनेमात काम करत आहेत बाकी त्यांच्यात काहीच नाही.

नगमा आता राजकारणातच सक्रीय आहे. ती काँग्रेस पक्षात आहे आणि सोशल मीडियावर पक्षाला सपोर्ट करत असते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही ती दिसली.