अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, अभिनयही सोडला; लेकाचा ११ वा वाढदिवस केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 03:02 PM2024-12-06T15:02:03+5:302024-12-06T15:17:52+5:30

अभिनेत्रीने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. मिखाईल असं तिच्या लेकाचं नाव आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या आता सिनेसृष्टीपासून दूर गेल्या आहेत. घर-संसारात व्यस्त झाल्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीला कायमचा रामराम केला.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे आयेशा टाकिया(Ayesha Takia). सलमान खानसोबत 'वॉन्टेड' सिनेमात दिसलेली आयेशा आता अभिनयापासून कायमची दूर गेली आहे.

मध्यंतरी आयेशा बोटॉक्स सर्जरीमुळे चर्चेत आली होती. तिच्या चेहऱ्यात झालेल्या बदलांमुळे ती खूपच ट्रोल झाली. तिला ओळखणंही कठीण झालं होतं.

नुकतंच आयेशाने तिच्या लेकाचे फोटो शेअर केले आहेत. तिचा मुलगा आता ११ वर्षांचा झाला आहे. 'मिखाईल' असं तिच्या मुलाचं नाव आहे. आयेशाने त्याच्या बर्थडे सेलिब्रिशनचे फोटो शेअर केले आहेत.

आएशाचा मुलगा अगदी तिच्यासारखाच दिसतो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच मिखाइल किती क्युट दिसतोय अशाही कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

आयशाने २००९ साली फरहान आजमीसोबत लग्नगाठ बांधली. तिने इस्लाम धर्म स्वीकारला. फरहान हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा मुलगा आहे. त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट आहे.

आयशाने पती आणि लेकासोबत काही फोटो शेअर केलेत. इंडस्ट्रीपासून दूर ती फॅमिली टाईम एन्जॉय करत आहे. ती संसारातच खूश असल्याचं दिसत आहे.

आयशा शेवटची २०११ साली आलेल्या 'मोड' सिनेमात दिसली. 'वॉन्टेड' सिनेमामुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय तिने 'डोर','दिल माँगे मोर','पाठशाला' अशा काही सिनेमांमध्ये काम केलं.