बेबी बम्पसह अभिनेत्रीचा जलवा, तीस-यांदा देणार बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:23 IST2021-03-15T18:18:34+5:302021-03-15T18:23:17+5:30

lisa haydon pregnant with her third child : वयाच्या ३४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार लिसा हेडन, नवीन फोटो शेअर करत फ्लॉन्ट केला बेबी बंम्प.

लिसा हेडननं गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली.

त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला.

सध्या लिसा प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय करत आहे.

तिने आता बेबी बंप फ्लॉन्ट करत स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये लिसाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळत आहे.

काही तासातच शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत 75 हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.

लिसा हेडन फिटनेस फ्रिक आहे. प्रेग्नंसी दरम्यानही ती स्वतःला फिट ठेवते.

तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या फिटनेसचे साक्षी देतात.

लीसा हेडनला दोन मुले आहेत, ज्यांचे नाव जॅक आणि लियो आहे.

येणाऱ्या जून महिन्यात तिच्या घरी तिस-यांदा छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करताना दिसत आहे.