अजय देवगणची अभिनेत्री ५३ व्या वर्षी करतेय कमबॅक, हेमा मालिनी अन् जुही चावलाशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:59 PM2023-02-22T15:59:28+5:302023-02-22T16:06:44+5:30

'फूल और कॉंटे' सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेली अजय देवगणची अभिनेत्री १२ वर्षांनंतर कमबॅक करत आहे.

अभिनेता अजय देवगणचा 1991 मध्ये 'फूल और कॉंटे' हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा तुफान हिट झाला होता.

या सिनेमात 'रोजा' फेम अभिनेत्री मधू ने भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे एका रात्रीत दोघेही स्टार झाले होते.

मधू गेल्या १२ वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. आता तिचे वय ५३ आहे. या वयातही तिची जादू कायम आहे आणि ती लवकरच कमबॅक करण्यास तयार आहे.

शाह फिल्मच्या 'गेम ऑन' सिनेमातून कमबॅक करत आहे. नुकतेच सिनेमाचे टीझर रिलीज झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून तिने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांत काम केले आहे. 1991 मध्ये तिने बॉलिवूडसोबतच मल्याळम सिनेमातही पदार्पण केले होते.

त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या 'रोजा'या ब्लॉकबस्टर सिनेमात तिने काम केले होते. या सिनेमातील अभिनयाने तिने सर्वांचेच मन जिंकले होते.

खूप कमी जणांना माहित असेल पण मधू ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची भाच्ची आहे. हेमामालिनी यांचे भाऊ रघुनाथ यांची मधू मुलगी आहे.

याशिवाय मधू आणि अभिनेत्री जुही चावला यांच्यातही नातं आहे. दोघीही जाऊबाई आहेत. मधूने आनंद शाहसोबत लग्न केलं आहे. ते जूही चावलाचे पती जय मेहताचे चुलत भाऊ आहेत.

मधूला 'लव्ह यू मिस्टर कलाकार'या सिनेमात शेवटचे बघितले गेले होते. हा सिनेमा २०११ मध्ये रिलीज झाला होता. यात तुषार कपूर आणि अमृता अरोरा मुख्य भूमिकेत होते.

तर २०२१ मध्ये तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला होता पण त्यात तिला कोणी फारसे नोटीस केले नाही. मधूला आता तिच्या आगामी सिनेमाकडून अपेक्षा आहेत.