Nikhil Kamath Net Worth:अब्जाधीश आहे मानुषीचा Boyfriend निखिल कामथ, जाणून घ्या त्याची ऐकूण संपत्ती !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:42 AM2022-11-23T09:42:33+5:302022-11-23T10:12:01+5:30

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा बॉयफ्रेंड निखील कामथ आज भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे.

Manushi Chillar: मानुषी छिल्लर सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मानुषीच्या डेटिंगच्या बातम्या सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मानुषी एका बड्या बिझनेसमन निखिल कामथ डेट करत असल्याची चर्चा आहे. जाणून घेऊया निखिल कामथ नक्की कोण आहे ज्याचं नाव मानुषीसोबत जोडलं जातंय. (फोटो इन्स्टाग्राम)

निखील कामथ आज भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आणि देशातील मोठा उद्योग ब्रोकरेज जेरोधा (Zerodha) चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

शाळा सोडल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी निखील कामथ यांनी व्यवसाय करण्यास सुरूवात केली आज त्यांच्याकडे जवळपास 17500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

इथपर्यंत पोहोचण्यासाठी निखिल यांनी बरीच मेहनत घेतली. कमी वयात त्यांनी मित्रांसोबत मिळून फोन विकण्याची सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)

निखिल यांच्या आईला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सगळं फोन तोडून टाकलं. यानंतर त्यांनी ८ हजारांमध्ये कॉल सेंटरमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यानंतर मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामत असोसिएट्स सुरू करण्यासाठी कॉल सेंटरचा जॉब सोडला. २०१० मध्ये त्यांनी बचतीच्या पैशातून 'जेरोधा' सुरू केलं.निखील कामत यांनी ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

ब्लूमबर्गनुसार, आज 'जेरोधा'ची आर्थिक उलाढाल ३५ अब्ज असेल. 'जेरोधा' ही देशातील पहिली ऑनलाईन ब्रोकरेज फर्म आहे. कमी गुंतवणुकीत सुरू झालेली ही कंपनी रिटेल शेअर ब्रोकिंगचं काम करते. (फोटो इन्स्टाग्राम)

निखिल यांचं लग्न झालं आहे मात्र फार काळ हे लग्न टिकलं नाही. इकनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार निखिल यांनी १८ एप्रिल २०१९मध्ये Amanda Puravankaraसोबत इटलीमध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. (फोटो इन्स्टाग्राम)