बर्थडे स्पेशल! प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालदीवमध्ये सेलिब्रेशन, रोमँटिक व्हेकेशनचे Photos चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:11 IST2024-08-30T15:06:00+5:302024-08-30T15:11:58+5:30
पती आणि मुलांसोबत घालवला 'क्वॉलिटी टाईम'!

बॉलिवूडला कायमच मालदीव्ह्जची भुरळ पडली आहे. अनेकदा कित्येक सेलिब्रिटी हे अधुनमधून मालदीव्ह्जची सैर करुन येतात. तेथील अप्रतिम सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करतात.
अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) सध्या वाढदिवसानिमित्त मालदीवला गेली आहे. तीन दिवसांपूर्वीच तिने जल्लोषात वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबत ती क्लॉलिटी टाईम घालवत आहे. इथले काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.
मालदीवचा निळाशार समुद्र आणि बोटीत बसून नवऱ्यासोबत तिने रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसंच यात नेहाचा हॉट अवतार दिसत आहे.
नेहाला मेहर आणि गुरिक अशी दोन मुलं आहेत. मेहर ६ वर्षांची तर गुरिक ३ वर्षांचा आहे. दोन्ही मुलांसोबत नेहाने क्युट फोटो शेअर केलेत. पाण्यात मस्ती करताना तर लेकीसोबत बीचवर तिने छानसा फोटो शेअर केला आहे.
बेडवर दोन्ही मुलांसोबत आरामात झोपलेले असतानाचा मायलेकांचा हा फोटो खूपच क्युट आला आहे. यात नेहाने मुलांचे चेहरे मात्र दिसू दिलेले नाहीत.
नेहा धुपियाने २०१८ साली अंगद बेदीशी विवाह केला. त्याआधीच ती प्रेग्नंट होती. त्याचवर्षी तिने मेहरला जन्म दिला. नंतर २०२१ मध्ये गुरिकचा जन्म झाला. यादरम्यान तिचं वजन कमालीचं वाढलं होतं. पण नेहाने मेहनतीने एका वर्षात तब्बल २३ किलो वजन घटवलं.
नेहाला तिच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. ती सध्या कमालीची बोल्ड अँड हॉट दिसत आहे. मालदीव्ह्जच्या या फोटोंमध्ये नेहामध्ये झालेला बदल स्पष्ट दिसून येतो.