ऑनस्क्रीन बाबांसोबत अभिनेत्रीला करायचं होतं लग्न; म्हणाली- "तुम्ही वयाने लहान असता तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:17 IST2025-03-27T16:00:27+5:302025-03-27T16:17:46+5:30
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ऑनस्क्रीन बाबांसोबत लग्न करण्याची इच्छा केली होती व्यक्त. कोण आहे ती अभिनेत्री?

या फोटोत संजय दत्तसोबत एक अभिनेत्री दिसतेय. जिने बॉलिवूडचा एक काळ गाजवलाय. या अभिनेत्रीने तिच्या ऑनस्क्रीन बाबांशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली होती.
ही अभिनेत्री आहे पूनम ढिल्लो. पूनम यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये अभिनय केलाय. एका सिनेमाच्या सेटवर पूनम यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन बाबांसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हा किस्सा पूनम ढिल्लो यांनी एका मुलाखतीत सांगितला. यावेळी पूनम यांनी त्यांचे ऑनस्क्रीन बाबा अर्थात सुनील दत्त यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
पूनम आणि सुनील दत्त यांनी 'लैला' या बॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर पूनम यांनी सुनील दत्त यांच्याजवळ मनातील इच्छा व्यक्त केली.
"तुम्ही आज तरुण असता तर मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा होती", असं पूनम यांनी गंमतीत सुनील दत्त यांना सांगितलं होतं. यामागे सुनील यांच्या अभिनयाप्रती पूनम यांचा आदरभाव होता.
पूनम गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. पूनम यांनी रिअल लाईफमध्ये १९८८ साली निर्माते अशोक ठकेरिया यांच्याशी लग्न केलं.
परंतु लग्नाच्या नऊ वर्षांनंतर पूनम यांनी पतीसोबत घटस्फोट घेतला. पूनम सध्या त्यांची मुलं पलोमा आणि अनमोल यांच्यासोबत राहत आहेत.