actress Rai Laxmi had affair with MS Dhoni says relationship with him is like a stain
"धोनीसोबतचं नातं हा आयुष्यभराचा डाग...", अभिनेत्रीच्या वक्तव्याची झालेली तुफान चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:57 PM2024-10-01T15:57:59+5:302024-10-01T16:36:50+5:30Join usJoin usNext धोनीचं 'या' अभिनेत्रीसोबत गाजलेलं अफेअर भारतीय क्रिकेटपटू 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीचं (Mahendra Singh Dhoni) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. दीपिका पदुकोणसोबत तर त्याच्या अफेअरची चर्चाच होती. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. २००८-०९ मध्ये एम एस धोनी आणि अभिनेत्री राय लक्ष्मी (Rai Laxmi) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. २००९ मध्ये दोघांना आयपीएलनंतर पार्टीत पाहिले गेले. तसंच धोनी अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीतही सहभागी झाला होता. २०१४ मध्ये रायलक्ष्मीने धोनीसोबतच्या अफेअरवर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, 'धोनीसोबतचं माझं नातं होतं हा पुढे माझ्या आयुष्यात एक डाग म्हणूनच राहणार याची मला कल्पना होतीच." "त्याच्यानंतरही मी काही जणांसोबत रिलेशनशिपमध्ये होते पण त्यावर कोणीच लक्ष दिलं नाही. लोक आजही त्याच गोष्टीवर बोलत आहे हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतंय. लोकांकडे एवढा वेळ कसा आहे असाच मला प्रश्न पडतो." मीडिया रिपोर्टनुसार, एमएस धोनी आणि रायलक्ष्मी यांच्यात करिअरमुळे दुरावा आला होता. रायलक्ष्मीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एकाच वर्षात धोनी साक्षीसोबत लग्नबंधनात अडकला. यादरम्यान तो कधीही रायलक्ष्मीसोबतच्या नात्यावर बोलला नाही. रायलक्ष्मीने मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच ती सिनेमांमध्ये काम करत आहे. तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. २००५ साली तिने तमिळ फिल्म karka kasadara मधून पदार्पण केलं. तर अजय देवगणच्या 'भोला' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. टॅग्स :महेंद्रसिंग धोनीTollywoodसेलिब्रिटीरिलेशनशिपMS DhoniTollywoodCelebrityrelationship