अभिनेत्री अदा शर्माचं मनमोहक सौंदर्य; फोटो होतायत व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:37 IST2024-04-26T16:28:50+5:302024-04-26T16:37:54+5:30

प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा.
अदा शर्मा जितकी सुंदर आहे तितकीच ती बोल्डही आहे.
अदा शर्मा ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर अदा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
कधी सिंपल साडीत तर कधी रॉयल लुकमध्ये अदा पाहायला मिळते. नेहमी ती आपले क्लासी फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. डिझायनर गाऊनमधील अदा शर्माच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लाल रंगाचा डिझायनर गाऊनमध्ये अदा एखाद्या परीसारखी सुंदर दिसत आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये अदाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अदा हिनं एकापेक्षा एक पोज देत चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.
अदा शर्माचे फोटो सोशल मीडियावर इतके व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.
अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'बस्तर: द नक्सल स्टोरी' या चित्रपटात शेवटची झळकली होती.