कंगना रानौतनंतर अध्ययन सुमन या मॉडेलला करतोय डेट, आहे ती खूप बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 21:00 IST2020-01-31T21:00:00+5:302020-01-31T21:00:00+5:30

कंगना रानौतचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन लोकप्रिय रिएलिटी शो स्प्लिट्सव्हिला ११ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत आहे.
मायरा व अध्ययन सुमन सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असतात.
मायरा मिश्रा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो स्प्लिट्सव्हिला ११ची स्पर्धक आहे.
मायराने अध्ययनच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करून लिहिले की, मला तुझ्यावर प्रेम करू दे.
सूत्रांच्या माहितीनुसार,मायरा व अध्ययन लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे.
मायरा व अध्ययनने इंस्टाग्राम अकाउंटवर सीक्रेट फोटो शेअर केला आहे. जो लग्न करण्याबाबतचा इशारा देत आहे.
या लग्नाला अध्ययन आणि मायराच्या घरातल्यांनी परवानगी दिली आहे.
शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन बॉलिवूडमध्ये यशस्वी नसला तरी तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो.