ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुखी संसाराला १८ वर्ष पूर्ण, दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले खास फोटो बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:27 IST2025-04-21T15:30:23+5:302025-04-21T16:27:10+5:30
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता.
या फोटोत अमिताभ बच्चन त्यांची लेक श्वेतासोबत थिरकताना दिसत आहेत. अभिषेकच्या लग्नाचा उत्साह अमिताभ यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय
ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांनीही लग्नात पारंपरिक कपडे परिधान केले होते. दोघांच्या लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी आजही अनेकांसाठी आदर्श म्हणून पाहिली जाते. दोघेही त्यांचं वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवणं पसंत करतात.
अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न केल्यानंतर त्यांच्या जोडीला 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जाऊ लागले.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त या दोघांच्या लग्नाचे व्हायरल झालेले फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोंना पसंती दिली आहे. याशिवाय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी आहे. आराध्या अनेकदा आईसोबत इव्हेंट आणि इतर कार्यक्रमात दिसते.