aishwarya rai bachchan follows just one celeb on social media that her husbund abhishek bachchan
IN PICS : लाखो लोक ऐश्वर्याला फॉलो करतात ती केवळ ‘या’ एकालाच फॉलो करते...!! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 03:55 PM2021-07-18T15:55:52+5:302021-07-18T16:04:51+5:30Join usJoin usNext ना अमिताभ ना शाहरुख...; कोण आहे तो नशीबवान? सौंदर्याची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वयाचं अख्खं बालपण मुंबईत गेलं आणि याच मुंबईत राहून तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे. दीर्घकाळापासून ऐश्वर्याचा एकही नवा सिनेमा रिलीज झालेला नाही. पण तिच्या फॉलोअर्सची संख्या मात्र वाढतेय. इन्स्टाग्रामवर तिचे 95 लाख फॉलोअर्स आहे. पण ऐश्वर्या स्वत: कोणाला फॉलो करते माहितीये? तर फक्त एका व्यक्तिला. होय, इन्स्टावर लाखो जण ऐश्वर्याला फॉलो करतात ती मात्र केवळ एकाच अभिनेत्याला फॉलो करते. तो कोण तर तिचा नवरा अभिषेक बच्चन. अगदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेले महानायक व तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनाही ती फॉलो करत नाही. मग जया बच्चन आणि नणंद श्वेता तर दुरची बात. तू फक्त अभिषेक बच्चन यालाच का फॉलो करते? असा प्रश्न तिला अनेकदा विचारला गेला. पण प्रत्येकवेळी अगदी चतुराईनं तिनं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. ऐश्वर्याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहाल तर त्यामध्ये केवळ कुटुंबीयांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील. पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या, सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे फोटो ती शेअर करते.टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनAishwarya Rai Bachchan