ऐश्वर्या राय बच्चनने अभिषेकबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'माझं त्याच्यावर कधीच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:14 PM2023-02-15T14:14:18+5:302023-02-15T14:18:14+5:30

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. ज्यानंतर अखेर २००७ मध्ये ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह बंधनात अडकली.

अभिषेक बच्चनने देखील अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत, ज्यानंतर आता तो वेबसिरीजसाठी काम करत आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या या दोघांना एक मुलगी आहे. जिचे नाव आराध्या असून ती नेहमी चर्चेत येत असते.

ऐश्वर्या राय २०१६ मध्ये करण सिंग छाबरा यांच्या टॉक शोमध्ये पोहोचली होती. या टॉक शोमध्ये अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. या शोमध्ये, जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आले की, तिचा कधी अभिषेक बच्चन किंवा तिच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीवर क्रश आहे का?

यावर ऐश्वर्याने उत्तर देत म्हटले की, मी विवाहित आहे आणि माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण माझा त्याच्यावर कधीच क्रश नव्हतं.

ती पुढे म्हणाली की,आम्ही मित्र होतो. मी त्याच्याशी लग्न केले तेव्हाही मला तसे वाटले नाही. किंवा कॉलेजमध्ये माझ्यापेक्षा लहान कोणत्याही माणसावर कधीच क्रश नव्हता.

अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेम कहाणी 'ढाई अक्षर प्रेम के' चित्रपटाच्या सेटवर फुलली होती.

२०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना अभिषेकने सांगितले की, १९९७ मध्ये 'और प्यार हो गया'च्या शूटिंगदरम्यान तो ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.

तो तिथे प्रॉडक्शन बॉय म्हणून उपस्थित होता. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि पहिल्या भेटीनंतरच तो ऐश्वर्यावर फिदा झाल्याचे त्याने सांगितले.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.