Aishwarya Rai Birthday special. her unseen pics
Happy Birthday Aishwarya : पाहा, बर्थ डे गर्ल ऐश्वर्या रायचे कधीही पाहिले नसतील असे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 04:06 PM2020-11-01T16:06:29+5:302020-11-01T16:21:41+5:30Join usJoin usNext आज ऐश्वर्याचा वाढदिवस सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे. ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला. अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर सजला. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर बॉलिवूडमध्ये ती आली. मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा 'और प्यार हो गया' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'जीन्स' या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनAishwarya Rai Bachchan