aishwarya rai shares father picture on his death anniversary PSC
ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीला शेअर केले हे फोटो, जागवल्या त्यांच्या आठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:27 PM2020-03-19T19:27:05+5:302020-03-19T19:39:15+5:30Join usJoin usNext ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने तिच्या वडिलांच्या फोटोसमोर तिची आई, भाऊ, अभिषेक आणि आराध्यासोबत फोटो काढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. कॅन्सरने त्रस्त असल्याने कृष्णराज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण तरीही दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच गेली. वडिलांच्या निधनानंतर ऐश्वर्या पूर्णपणे खचली होती. पण तिला तिचा पती अभिषेकने या दुःखातून बाहेर पडण्यास मदत केली. ऐश्वर्या रायच्या कुटुंबियांच्या या दुःखात संपूर्ण बच्चन कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते. ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ऐश्वर्या तिच्या वडिलांची प्रचंड लाडकी होती. तिने अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले आहे. टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनAishwarya Rai Bachchan