त्याला 'ती' घमेंडी वाटायची, तिला 'तो' खडूस..मग कसं पडले अजय देवगण-काजोल एकमेकांच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:14 PM2023-02-24T12:14:45+5:302023-02-24T14:29:54+5:30

आज त्यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो.

बॉलिवूडच्या ज्या काही सदाबहार जाेड्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे काजोल आणि अजय देवगण.. तब्बल २४ वर्षांचा त्यांचा संसार.. (Photo Instagram)

२४ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. त्यामुळेच त्यांची लव्हस्टोरी आज जाणून घेऊयात.(Photo Instagram)

काजोल आणि अजय १९९५ साली 'हलचल' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पहिल्यांदा भेटले. शुटिंगच्या पहिल्याच दिवशी काजोलला जेव्हा सेटवर एका कोपऱ्यात खाली मान घालून बसलेला अजय दिसला, तेव्हा त्याला पाहून तर तिने तोंड वाकडे केले होते.. पहिल्या भेटीत तिला तो अजिबातच आवडला नव्हता.. (Photo Instagram)

अजयचंही काही वेगळं नव्हतं. त्याला सुद्धा काजोलमध्ये खूप जास्त ॲटीट्यूट आहे, असं वाटायचं. तिची बडबड त्याला मुळीच आवडायची नाही. त्याला असं वाटायचं की ती खूपच जास्त घमेंडी आहे.(Photo Instagram)

काम करता करता दोघं एकत्र आले, मैत्री म्हणण्या इतपत त्यांच्यात संवाद सुरू झाला होता. त्यावेळी काजोल दुसऱ्या कुणासोबत रिलेशनमध्ये होती. तिच्या बॉयफ्रेंडच्या तक्रारी ती अजयला सांगायची आणि अजय त्यावर सोल्यूशनही द्यायचा म्हणे. नंतर तिचं ब्रेकअप झालं आणि कधी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही..(Photo Instagram)

त्यांच्या लव्हस्टोरीचा एक अजब किस्सा आहे. दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलंच नाही म्हणे. साडेतीन चार वर्षे ते एकमेकांना डेट करायचे. सोबत फिरायचे. आता आपलं नातं मैत्रीच्या बरंच पुढं गेलंय हे त्यांना समजलं होतं. पण तरीही कुणी कुणाला प्रपोज केलेलं नव्हतं. त्यानंतर अख्खं आयुष्य एकमेकांसोबत घालवायला आपण तयार आहोत, हे त्यांनी जाणलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo Instagram)

अजय देवगणच्या घरून त्यांच्या लग्नाला विरोध नव्हता. पण काजोलच्या घरी मात्र तिचा हा निर्णय फारचा पचलेला नव्हता. लग्नाऐवजी तिने तिच्या करिअरवर फोकस करायला पाहिजे, असं काजोलच्या घरच्यांचं म्हणणं होतं. काजोल ऐकायला तयारच नाही म्हटल्यावर काही दिवसांनी त्यांचा विरोध मावळला आणि दोघांचं १९९९ साली मराठी आणि पंजाबी या दोन्ही पद्धतींनी रितसर लग्न झालं.(Photo Instagram)

लग्न झाल्यानंतर काजोलने आपल्या संसाराला प्राधान्य दिलं आणि बॉलिवूडमधला तिचा वावर कमी झाला. मोजकेच चित्रपट ती करायला लागली. न्यासा आणि युग अशी त्यांची दोन मुलं..(Photo Instagram)

लग्नानंतर त्या दोघांनी काही निवडक चित्रपटांमधून एकत्र काम केलं. तान्हाजी या चित्रपटात दिसलेली दोघांची जोडी पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना सुखावून गेली होती. (Photo Instagram)