'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस? By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 09:51 AM 2024-10-09T09:51:16+5:30 2024-10-09T10:42:51+5:30
Singham Again : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार ॲक्शन आणि थ्रिलरने व्यापलेल्या या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार ॲक्शन आणि थ्रिलरने व्यापलेल्या या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे.
यासोबतच सध्या चर्चा आहे ती चित्रपटातील स्टारकास्टच्या मानधनाची. होय, बॉलिवूडची आवडत्या फ्रँचायझीपैकी एक असलेल्या या चित्रपटाच्या भागासाठी रोहित शेट्टीने पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे समाेर आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या चित्रपटातील स्टारकास्टने किती कोटींच्या घरात मानधन घेतलेय ते.
या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगण साकारत आहे. तो पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात चित्रपटात दिसेल. अजयने सर्वांत जास्त म्हणजे ३५ कोटी एवढे मानधन आकारले आहे.
अक्षय कुमारने या चित्रपटात त्याने कॅमिओ साकारला असून त्यासाठी २० कोटी रूपये आकारले आहेत.
बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खान ही या चित्रपटात अवनी कामथ सिंघम ही भूमिका करत असून यात बाजीराव सिंघमच्या पत्नीची भूमिका करतेय. यासाठी तिने तब्बल १० कोटी आकारल्याचे समजते.
अलिकडेच बाबा झालेल्या अभिनेता रणवीर सिंगने या चित्रपटात कॅमिओ केला असून तो पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. केवळ त्यासाठी त्याने १० कोटी एवढे तगडे मानधन आकारले आहे.
दीपिका सध्या तिचे मदरहूड एन्जॉय करत असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तरी, या चित्रपटात तिने लेडी सिंघम ही भूमिका साकारली असून तिच्या भूमिकेची प्रचंड चर्चा आहे. यासाठी तिने ६ कोटी एवढे मानधन घेतले आहे.
बाजीराव सिंघमला टक्कर देणारा खलनायक म्हणून अर्जुन कपूर यात भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी त्याने करीनाएवढे तब्बल ६ कोटींचे मानधन घेतले आहे.
ॲक्शन स्टार टायगर श्रॉफ हा यात एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात टायगरने केवळ ३ कोटी एवढे मानधन घेतले आहे.
अभिनेता जॅकी श्रॉफ हा यात खलनायक उमर हाफिज या व्यक्तीरेखेत दिसणार आहे. त्याने या चित्रपटासाठी सर्वांत कमी म्हणजे २ कोटी एवढे मानधन घेतले आहे.