अजय देवगण-काजोलची लेक न्यासा नेहमीच असते लाइमलाइटमध्ये, जाणून घ्या तिचं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:02 PM2023-01-04T13:02:28+5:302023-01-04T13:06:20+5:30

Nyasa Devgn : काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगन ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी नेहमीच चर्चेत असते.

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगन ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी नेहमीच चर्चेत असते.

१९ वर्षीय न्यासा तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. या स्टार किडने नुकतेच दुबईमध्ये तिच्या जवळच्या मित्रांसोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले.

न्यासाने तिचा मित्र ओरहान अवत्रामणीसोबत न्यू इयर पार्टी एन्जॉय केली आणि पार्टीमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस दिसत होती. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिचा हा हॉट अवतार पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे, पण काजोलची मुलगी न्यासा हिला या सगळ्यावर काहीच हरकत नाही.

न्यासाचा जन्म २० एप्रिल २००३ रोजी मुंबईत झाला. मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले.

हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ती सिंगापूरला गेली.

युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशियामध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यासाला तिच्या रिकाम्या वेळेत प्रवास करणे, कॉमिक्स वाचणे आणि टीव्ही पाहणे आवडते.

स्टार किड्सही अनेकदा मित्रांसोबत पार्टी करताना दिसतात.

न्यासा तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे देखील चर्चेत आहे.

खरंतर न्यासाच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे.

आता ही स्टारकिड्स पूर्वीपेक्षा खूपच सुंदर झाली आहेत.