Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:05 PM2024-09-24T16:05:33+5:302024-09-24T16:25:23+5:30

Akshay Kumar : अभिनेत्याने सांगितलं होतं की, खऱ्या आयुष्यात त्याचा चंबळच्या डाकूंशी सामना झाला आहे.

अक्षय कुमारने आपल्या कारकिर्दीत खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि कोणाच्याही सपोर्टशिवाय या अभिनेत्याने आपल्या टॅलेंटने इंडस्ट्रीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक हिट चित्रपट केले.

हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा स्टार होण्यापूर्वी अक्षय कुमारला खूप संघर्ष करावा लागला होता. काही वर्षांपूर्वी तो जेव्हा अनुपम खेर यांच्या चॅट शोमध्ये आला होता तेव्हा त्याने एक धक्कादायक खुलासा केला.

अभिनेत्याने सांगितलं होतं की, खऱ्या आयुष्यात त्याचा चंबळच्या डाकूंशी सामना झाला आहे. अनुपम खेर यांच्या कुछ भी हो सकता है शोमध्ये अक्षय कुमारने खुलासा केला होता.

एकदा ट्रेनमध्ये प्रवास करताना त्याचा चंबळच्या डाकूंसोबत सामना झाला होता. अभिनेत्याने सांगितलं की, "मी ४५००-५००० रुपयांचं सामान घेतलं होतं, माझे कपडे घेतले होते."

"सर्व सामान नीट ठेवलं होतं आणि चंबळ आल्यावर दरोडेखोर ट्रेनमध्ये चढले. माझ्या बोगीच्या आतमध्ये आले. मी झोपलो होतो. त्यानंतर थोडासा आवाज आला म्हणून मी डोळे उघडले. तर समोर डाकू."

"मी काहीच बोललो नाही. गप्प तसाच पडून राहिलो. ते सर्वांचं सामान घेऊन जात होते. हे मी पाहत होतो. हळूहळू ते माझ्याजवळ आले आणि माझंही सामान त्यांनी काढून घेतलं. मी आवाज केला असता तर त्यांनी मला गोळ्या घातल्या असत्या."

"मी बघत होतो आणि रडत होतो, मग त्यांनी सर्व सामान काढून घेतलं, त्यांनी माझी चप्पलही सोडली नाही, त्यांनी इतर लोकांची चप्पलही काढून घेतली. काहीही सोडलं नाही. मी ४५०० रुपये किमतीचं सामान घेतलं होतं. पण दिल्ली स्टेशनवर मी सामानाशिवाय उतरलो."

अक्षय कुमारचे या वर्षात आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बडे मियाँ, छोटे मियाँ, सरफिरा आणि खेल खेल में हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.

अभिनेता लवकरच प्रियदर्शनच्या 'भूत बंगला' आणि रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. अक्षयचे असंख्य चाहते आहेत. तो सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो.