Akshay Kumar Son Aarav Bhatia : कधी होणार अक्षय कुमारच्या लेकाचा डेब्यू? सध्या काय करतोय आरव कुमार? By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:34 PM 2023-02-24T16:34:44+5:30 2023-02-24T16:43:28+5:30
Akshay Kumar Son Aarav Bhatia : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आरव सिनेमांत येणार का, असा प्रश्न दीर्घकाळापासून चाहत्यांच्या मनात आहे. आता खुद्द अक्षयने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. Aarav Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चलती आहे. लवकरच शाहरूखची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची लेक खूशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा असे सगळे यावर्षी डेब्यू करत आहेत. आता अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार भाटियाची चर्चा आहे.
होय, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आरव सिनेमांत येणार का? असा प्रश्न दीर्घकाळापासून चाहत्यांच्या मनात आहे. आता खुद्द अक्षयने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
अन्य स्टारकिड्सप्रमाणे तुझा मुलगा आरवही बॉलिवूड डेब्यू करणार का? असा प्रश्न एका मुलाखतीत अक्षयला विचारला गेला. यावर उसको शौक नहीं है, असं उत्तर अक्षयने दिलं.
आरवला ॲक्टिंगमध्ये रस नाही, हे अक्षयने स्पष्ट केलं आहे. माझा वारसा माझ्या मुलांनी पुढे न्यावा, असा विचार मी करत नाही. फक्त माझ्या मुलांनी आनंदी राहावं, एवढीच माझी इच्छा आहे, असंही अक्षयने स्पष्ट केलं.
आरव अनेकदा आपल्या मित्रांसोबत दिसतो. मीडियासमोर येताच आरव आपला चेहरा लपवतो. कदाचित आरव स्वभावाने काहीसा लाजरा आहे. पण मम्मा ट्विंकल खन्नाचे मानाल तर, आरवचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे.
आरव सध्या सध्या २० वर्षांचा आहे. १५ सप्टेंबर २००२ रोजी जन्मलेला आरव सध्या सिंगापूरमध्ये शिकतोय. मात्र बॉलिवूडमध्ये ॲक्टिंग करण्याचा त्याचा कोणताही इरादा नाही.
आरवला स्पोर्ट्स मध्ये जास्त इंट्रेस्ट आहे. त्यानं शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी तो सिंगापूरला रवाना झाला.
आरवनं वयाच्या चौथ्या वर्षी मार्शल आर्टचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानं Okinawa, Kudo आणि Goju Ryu Karate मध्ये ब्लॅक बेल्ट जिंकला आहे आणि जूडो नॅशनल चॅंपियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे.
वयाच्या ७ व्या वर्षी त्याला 'ग्रीन ग्लोब फॉर आऊटस्टॅंडिंग कॉन्ट्रिब्युशन बाय ए चाइल्ड' चा पुरस्कार मिळाला होता. तो 'लाइट ए बिलियन लाइव्ह' कॅंपेन अंतर्गत गावांना स्पॉन्सर करणारा पहिला यंगस्टर ठरला होता.