आलियाच्या मेहंदी सेरेमनीत ढसाढसा रडली आकांक्षा रंजन, इतक्या दिवसानंतर समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 11:34 AM2022-05-01T11:34:04+5:302022-05-01T11:42:45+5:30

Alia Bhatt: बॉलिवूड स्टार आलिया भट नुकतीच लग्नबंधनात अडकली. लग्नाला येत्या 14 तारखेला महिना होईल. पण या लग्नाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत.

बॉलिवूड स्टार आलिया भट नुकतीच लग्नबंधनात अडकली. लग्नाला येत्या 14 तारखेला महिना होईल. पण या लग्नाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत.

आता आलियाची मैत्रिण आकांशा रंजन हिने आलियाच्या मेहंदी सेरेमनीचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आकांशा आलियाच्या मेहंदी सेरेमनीत ढसाढसा रडताना दिसतेय.

आकांक्षाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेहंदी सेरेमनीत आकांक्षाने धम्माल मस्ती केली, त्याचेही फोटो यात आहेत.

एका क्षणाला मात्र ती भावुक झाली. मैत्रिण सासरी जातेय, कदाचित या कारणानं तिला अश्रू आवरले नाहीत. कदाचित हे अतिआनंदानं तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागलेत.

या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण यावरून आकांक्षाला ट्रोलही करत आहेत.

नवरीनं रडायला हवं आणि ही रडतेय, असं एका युजरनं लिहिलं आहे. एका फोटोत आलिया आकांक्षाला शांत करताना दिसतेय.

एका फोटोत करण जोहर हा सुद्धा आकांक्षाला समजवताना दिसतोय. आकांक्षा ही आलियाची बेस्ट फ्रेन्ड आहे.

दोघीही अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. या फोटोत दोघींमधला बॉन्ड स्पष्ट दिसतो.