Alia Bhatt Pregnancy: रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधीच आलिया भट होती प्रेग्नेंट?, अभिनेत्रीच्या बहिणीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 02:31 PM2022-10-14T14:31:35+5:302022-10-14T14:36:14+5:30

Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या लग्नापासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लग्नापूर्वीच ती प्रेग्नेंट होती का, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान आता तिच्या बहिणीने याबाबत खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

आलिया भटने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून ती आई होणार असल्याचे सांगितले तेव्हापासून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले होते, हे समजल्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते.

लोकांनी तर लग्नाआधीच आलिया भट प्रेग्नंट असल्याचं म्हटलं होतं. आता आलिया भटची बहीण शाहीन भटने एका मुलाखतीत या सर्व गोष्टींबद्दल बरेच काही सांगितले आहे.

चाहत्यांना आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी आवडते. काही काळापूर्वी आलिया भटने प्रेग्नंट असल्याची माहिती शेअर केली होती, तेव्हा तिला यावरून खूप ट्रोल करण्यात आले होते.

सोशल मीडियावर लोकांनी तर आलिया भट्ट लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं होतं. आता आलिया भटची बहीण शाहीन भटने याबाबत खुलासा केला आहे.

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत शाहीन म्हणाली, "तुम्ही सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. आलिया आणि रणबीर दोघेही स्टार आहेत. लोक या दोघांवर सतत लक्ष ठेवतात. लोक या दोघांबद्दल नकारात्मक कमेंटही करतात. पण कशाकडे लक्ष द्यायचे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचे हे शिकणे फार महत्वाचे आहे.

शाहीन भटच्या या उत्तरानंतर ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट करण जोहरच्या रॉकी आणि रानी की लव्हस्टोरी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय रणवीर सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.