Ranbir Kapoor: रणबीरच्या वाढदिवशी आलियाने शेअर केले unseen photos; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:16 PM2024-09-28T13:16:08+5:302024-09-28T13:28:24+5:30

राहाच्या आयुष्यात येण्याने रणबीरची वेगळी बाजू आता समोर आली आहे. त्याचं लेकीवरचं प्रेम वेळोवेळी पाहायला मिळालं आहे.

बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. कपूर कुटुंबाचा हा लाडका रणबीर आज दीड वर्षांच्या मुलीचा बाबाही आहे. पत्नी आलियाने (Alia Bhatt) रणबीरला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर कपूर पदार्पणातच लोकप्रिय झाला होता. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. कमाल अभिनय आणि चार्मिंग लूकमुळे त्याने सर्वांनाच भुरळ घातली. आपल्या कुटुंबासोबत त्याने काल वाढदिवस साजरा केला.

आलिया भटने रणबीरचे काही खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर, आलिया आणि त्यांची लाडकी लेक राहा यांचा पहिलाच फोटो लक्ष वेधून घेतोय.यामध्ये हे तिघंही झाडाला घट्ट पकडून उभे आहेत. रणबीर राहाकडे कौतुकाने बघतोय तर राहा मागे कॅमेऱ्याकडे हसत पाहत आहे.

एका फोटोत रणबीर पाठमोरा आहे तर त्याच्या कडेवर राहा आहे. यात राहाचा चिमुकला चेहरा दिसतोय तर रणबीरने त्याची फेवरेट कॅप घातली आहे. रणबीरचं लेकीवरचं प्रेम वेळोवेळी दिसून आलं आहे.

आणखी एका फोटोत रणबीर राहाचा हात धरुन चालत आहे. घोड्यांच्या तबेल्यात ते फिरत आहेत आणि राहा कौतुकाने घोड्यांकडे पाहत आहे. रणबीर लेकीला नवनवीन गोष्टी एक्स्प्लोअर करतोय.

तसंच आलियाने रणबीरसोबत एक रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. फोटोब्लर असला तरी त्यांच्यातलं प्रेम यात दिसून येतंय. रणबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात आहे.

'कधीकधी तुम्हाला एका घट्ट मिठीची गरज असते...तुझ्यामुळे आयुष्यात मला ती मिठी मिळाली आहे. हॅपी बर्थडे बेबी' असं कॅप्शन आलियाने दिलं आहे.