लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:24 IST2024-09-25T15:01:35+5:302024-09-25T15:24:59+5:30
Alia Bhatt, Paris fashion week debut: आलिया भट्टने पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पणातच खळबळ उडवून दिली

Alia Bhatt at Paris fashion week debut:
बॉलिवूडची आघाडीची नायिका आलिया भट्टने पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पणाच्या वर्षी खळबळ उडवून दिली आहे.
आलिया अलीकडेच L'Oreal ब्रँडचा एक भाग बनली आणि आता तिने पहिल्यांदाच फॅशन वीकमध्ये सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली.
आलिया इतक्या क्लासिक स्टाईलमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर अजिबात हटल्या नाहीत.
हॉलिवूडच्या अनेक सुंदरी आणि बॉलिवूडमधील सौंदर्यवतींना टक्कर देईल इतकी आलिया पॅरिस फॅशन वीकमध्ये सुंदर दिसत होती.
आलियाने मेटॅलिक कॉर्सेट ड्रेस परिधान करून बहुचर्चित पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर दिमाखात एन्ट्री घेतली.
तिने धारण केलेल्या लूकमध्ये ती कपड्यांप्रमाणेच चांदीसारखी चमकली आणि इतरांपेक्षा खूपच हॉट आणि वेगळी दिसली.
आलियाच्या रॅम्प वॉक पासून ते तिच्या मेटॅलिक सिल्व्हर लूक पर्यंत साऱ्याच गोष्टींचा आता सर्वत्र चर्चा होत आहे.
पॅरिस फॅशन वीकमधून समोर आलेल्या फोटोंमध्ये आलिया समोर उभी असून तिच्याच सौंदर्याची चहुबाजूंनी चर्चा रंगलीय. (फोटो सौजन्य- आलिया भट्ट, गौरव गुप्ता इन्स्टाग्राम)