PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:33 PM2022-04-19T15:33:20+5:302022-04-19T15:39:42+5:30

Alia Bhatt : लग्नानंतर पहिल्यांदा आलिया एअरपोर्टवर दिसली. यावेळी पिंक सूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मिसेस कपूर कामावर परतलीये. होय, आलिया भट लग्नाच्या आठवड्याभराच्या आतच कामावर परतली आहे.

14 एप्रिलला आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आणि आज लग्नाच्या पाचव्याच दिवशी कामावर परतली.

लग्नानंतर पहिल्यांदा आलिया एअरपोर्टवर दिसली. यावेळी पिंक सूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बेबी पिंक कलरचा सूट, मॅचिंग ओढणी, न्यूड मेकअप आणि माथ्यावर छोटीशी टिकली असा तिचा लूक चाहत्यांना प्रचंड भावला.

लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान रद्द करत रणबीर कपूर कामावर परतला आहे. आलिया सुद्धा कामाला लागली आहे.

यावेळी आलियाने मीडियाला हसत हसत पोझ दिल्यात. आपली वेडिंग रिंग फ्लॉन्ट करताना ती दिसली.

मनीष मल्होत्रा व करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’च्या शूटींगसाठी काही दिवस जेसलमेर येथे आलियाचा मुक्काम राहणार आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेन्द्र, शबाना आझमी, जया बच्चन लीड रोलमध्ये आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.