अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:49 PM2022-01-31T12:49:36+5:302022-01-31T13:08:24+5:30

Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही

Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही. Pushpa: The Rise सिनेमाने त्याला नॅशनल स्टार तर बनवलंच सोबतच त्याला मिळालेल्या या यशानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांचं सिंहासन धोक्यात आलं आहे. ऑरमेक्स मीडियाच्या मंथली रिपोर्टनुसार, या महिन्या साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने पहिल्यांदा महेश बाबूला मागे टाकलं. तर ज्यूनिअर एनटीआरने सुपरस्टार प्रभासला मागे टाकलं. चला बघुया टॉप १० साऊथ सुपरस्टारच्या लिस्टमध्ये कोण कोण आहेत.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) - अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच टॉलिवूडचा प्रिन्स महेश बाबू याला मागे टाक नंबर वनचं सिंहासन मिळवलं आहे. ऑरमेक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने पॉप्युलॅरिटीच्या बाबतीत जानेवारी महिन्यात नंबर वन पोजिशन मिळवली आहे.

जूनियर NTR (Jr. NTR) - साऊथ सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआरने टॉप १० पॉप्युलर साऊथ स्टार्स या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. RRR स्टारने मोठी उडी घेत हे स्थान मिळवलं आहे.

प्रभास (Prabhas) - ऑरमेक्स मीडियाच्या या रिपोर्टनुसार, 'बाहुबली' स्टार प्रभास या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात प्रभास या यादीत नंबर १ आणि २ वर होता.

महेश बाबू (Mahesh Babu) - टॉलिवूडचा प्रिन्स महेश बाबू यावेळी या यादीतून टॉप ३ मधून बाहेर झाला आहे. गेल्या एका वर्षात त्याचं रेटींग सर्वात कमी राहिलं. महेश बाबूला ऑरमेक्सच्या मंथली रेटींग रिपोर्टमध्ये ४ पोजिशन मिळाली आहे.

पवन कल्याण (Pawan Kalyan) - साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणला या यादीत पाचवं स्थान मिळालं आहे. या यादीत त्याने आपला पुतण्या राम चरण सारख्या तरूण कलाकाराला लोकप्रियतेच्या बाबतीत मागे सोडलं आहे.

राम चरण (Ram Charan) - साऊथ सुपरस्टार राम चरण याला ऑरमेक्स मीडियाच्या या मंथली रेटींग रिपोर्टमध्ये सहावं स्थान मिळालं आहे. चरणला यावेळी RRR सारखा सिनेमा करूनही लोकप्रियतेत त्याचा फायदा झाला नाही.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) - साऊथचा यूथ आयकन लायगर स्टार विजय देवरकोंडा फार मागे आहे. या यादीत त्याला ७ वं स्थान मिळालं आहे. तो लवकरच लायगर सिनेमाच्या माध्यमातून धमाका करणार आहे.

नानी (Nani) - साऊथचा नॅच्युरल स्टार नानीचा नुकताच रिलीज झालेला श्याम सिंह रॉय सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. त्यामुळे त्याला या यादीत ८ वं स्थान मिळालं.

चिरंजीवी (Chiranjeevi) - साऊथचा मेगास्टार चिरंजीवीला ऑरमेक्स मीडिया रिपोर्टमध्ये ९वं स्थान मिळालं आहे. चिरंजीवी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ऑल टाइम नंबर वन स्टार आहे.

नागा चैतन्य (Naga Chaitanya) - सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य याला या यादीत १०वं स्थान मिळालं आहे. नागा या यादीत सामंथा रूथ प्रभूसोबत तुटलेल्या लग्नामुळे आहे.

हैराण करणारी बाब ही आहे की, या यादीत साऊथचा नंबर १ सुपरस्टार विजय थलापति आणि सुपरस्टार विजय सेतुपति यांची नावे नाहीत.