नीना गुप्तांच्या प्रेमात वेडे झाले होते आलोकनाथ; 'या'कारणामुळे तुटलं संस्कारी बाबूजींचं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 15:15 IST2023-07-30T15:10:22+5:302023-07-30T15:15:50+5:30
Aloknath: मालिकेच्या सेटवर या दोघांची जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. मात्र, ही मालिका संपण्यापूर्वीच ते वेगळे झाले.

'हम आपके है कौन' या सिनेमातून प्रचंड प्रसिद्ध मिळवलेला अभिनेता म्हणजे आलोक नाथ. अनेक सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारल्यामुळे त्यांना कलाविश्वातील संस्कारी बाबूजी या नावाने ओळखलं जातं.
संस्कारी बापूजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांचं आयुष्य बरंच वादग्रस्त राहिलं आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मध्यंतरी त्यांचं हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.
सध्या आलोकनाथ त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात ते वेडे झाले होते.
'बुनियाद' या मालिकेतून आलोकनाथ यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या सुनेच्या भूमिकेत होत्या.
विशेष म्हणजे, या मालिकेच्या सेटवर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.
मालिकेच्या सेटवर या दोघांची जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. मात्र, ही मालिका संपण्यापूर्वीच ते वेगळे झाले. नीना गुप्ता यांना डेट करण्यासोबतच आलोकनाथ अन्य एका मुलीलाही डेट करत होते.
नीनापासून वेगळे झाल्यानंतर आलोक नाथ यांनी 1987 मध्ये आशु सिंहसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एका मुलगीदेखील आहे.
आलोकनाथ आणि नीना गुप्ता यांचं नातं चांगलंच गाजलं होतं.
आलोक यांनी 1982 मध्ये 'गांधी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.