Ameesha Patel Birthday Special : ameesha patel had sent a legal notice to her father
बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेल्या अमिषा पटेलने चक्क वडिलांनाच पाठवली होती लीगल नोटिस, चांगलाच रंगला होता वाद By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:31 PM2020-06-09T14:31:17+5:302020-06-09T14:37:12+5:30Join usJoin usNext कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे अमिषा पटेलने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अमिषा पटेलच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य मीडियात गाजले. दिग्दर्शक विक्रम भटसोबतच्या तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. अमिषा पटेलचा तिच्या कुटुंबियांसोबत देखील चांगलाच वाद झाला होता. अमिषाने चक्क तिच्या वडिलांवर १२ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. अमिषाने कमवलेल्या पैशांचा तिचे वडील चुकीच्या पद्धतीने वापर करतात असे तिचे म्हणणे असल्याने तिने वडिलांना लीगल नोटिस पाठवली होती. अमिषा आणि तिच्या कुटुंबियांचा वाद कोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच २००९ मध्ये अमिषा पुन्हा एकदा तिचा भाऊ अश्मित पटेलसोबत एका चित्रपटगृहात दिसली होती. त्यानंतर त्यांच्यात असलेला वाद निवळला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अमिषाच्या आईने देखील त्यांच्यात असलेला वाद मिटला असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. अमिषाने तिच्या करियरच्या सुरुवातीला खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी हमराज या चित्रपटानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप व्हायला लागले. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. पण तिथे देखील तिला यश मिळाले नाही. अमिषा चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अमिषा पटेलचा आज वाढदिवस असून गदर एक प्रेम कथा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.टॅग्स :अमिषा पटेलAmisha Patel