बिग बींनी सेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती धमकी, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:55 PM2024-06-14T17:55:42+5:302024-06-14T18:10:24+5:30

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी १००हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचं प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. मात्र अभिनयाच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते त्यांच्या सहअभिनेत्रीवर फारच संतापले होते. हा किस्सा १९७८मध्ये रिलीज झालेला चित्रपट कसमे वादेच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

बॉलिवूडमधील स्टार्सचे वाद, भांडणांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. राज कुमार, राजेश खन्ना आणि सलमान खान यांसारख्या अनेक स्टार्समधील भांडणाचे किस्से समोर आले आहेत. मात्र, नेहमी शांत आणि गंभीर दिसणाऱ्या या शतकातील सुपरस्टारने एकदा सेटवर सर्वांसमोर आपल्याच सहअभिनेत्रीला धमकावले होते.

अमिताभ बच्चन यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्यासोबत काम करणे हे आज प्रत्येक नवीन अभिनेत्याचे स्वप्न आहे. पण, अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना त्यांच्याच सहकलाकारावर खूप राग आला. १९७८ मध्ये रिलीज झालेल्या 'कसमे वादे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती.

अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, राखी गुलजार, अमजद खान, नीतू सिंग, रेखा यांनी १९७८ मध्ये रिलीज झालेल्या 'कसमे वादे' चित्रपटात काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर राखी यांनी अमिताभ बच्चन यांच्या तोंडावर जोरदार थापड मारली होती. या थापडचा प्रतिध्वनी इतका मोठा होता की सेटवर शांतता पसरली होती. इथून सगळा खेळ सुरू झाला. तुम्ही विचार करत आहात की राखी यांनी खरंच बिग बींना थापड मारली होती. तर नाही. तो चित्रपटातील एक सीन होता.

एका मुलाखतीत राखी यांनी स्वतः खुलासा केला होता की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या गालावर थापड मारल्याने ते खूप संतापले होते. मेकर्सची मागणी होती की ही थापड अशी असावी की ज्यामुळे अमिताभ बच्चन यांना धक्का बसेल. त्यामुळे राखी यांनी हा सीन पूर्ण उत्साहात साकारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सीन सुरू झाला आणि अमिताभ बच्चन त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांनी पूर्ण ताकदीने त्यांना थापड लगावली.

सेटवर येताच अमिताभ बच्चन यांना सर्वांसमोर जोरदार चपराक बसल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यावेळी अमिताभ बच्चन खूप आश्चर्यचकित झाले होते आणि म्हणाले होते की, 'हे बरोबर नाही, मी सोडणार नाही, बदला घेईन...' बिग बीं चिडू नयेत म्हणून निर्मात्यांनी त्यांना सांगितले की, हे या सीनसाठी आहे. यानंतर त्यांचा राग शांत झाला. राग शांत झाल्यावर त्यांनी राखी यांना या थापडवरून चिडवायला सुरुवात केली होती आणि मस्करी करत बदला घेण्याची धमकीही दिली.

१९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांचे एकूण ६ चित्रपट प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे अभिनेत्याच्या या ६ चित्रपटांनी यशाची चव चाखली. यामध्ये 'गंगा की सौगंध', 'कसमीं वादे', 'बेशरम', 'त्रिशूल', 'डॉन', 'मुक्कदर का सिकंदर' यांचा समावेश आहे. सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले, पण 'मुक्कदर का सिकंदर' त्या वर्षातील सर्वात हिट ठरला.

'कसमे वादे' चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, 'कसमे वादे' हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन रमेश बहल यांनी केले आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्या वर्षी चित्रपटाने ४ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.