अमृता रावची छोटी बहीण प्रीतिकाला पाहिलंत का? लोकप्रिय मालिकेत साकारली आलियाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:26 IST2024-12-05T12:04:55+5:302024-12-05T12:26:16+5:30

कुठे गायब झाली अभिनेत्री प्रीतिका राव?

'विवाह' फेम अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) तर सगळ्यांनाच माहित आहे. मात्र अमृताला एक छोटी बहीणही आहे हे फार कमी जणांना माहित असेल. तिचं नाव प्रीतिका राव (Preetika Rao).

प्रीतिकाचा जन्म कर्नाटकात झाला. सोफिया कॉलेजमधून तिने शिक्षण घेतलं. तसंच एडव्हर्टायझिंग अँड जर्नलिझमचा कोर्सही केला. तसंच न्यूयॉर्क अॅकॅडमीत ब्रॉडकास्ट जर्नलिझमचं शिक्षण घेतलं.

नंतर प्रीतिकाने बहिणीप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिने छोटा पडदा निवडला. प्रीतिकाने अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.

२०१३ साली आलेली'बेइंतहा' मालिकेतील आलिया जैन ही तिची भूमिका खूप गाजली. तसंच तिने 'लव्ह का है इंतजार','लाल इश्क' या मालिकांमध्येही काम केलं.

कामाचं कौतुक होऊनसुद्धा प्रीतिकाकडे अमृताची बहीण म्हणूनच पाहिलं जायचं. प्रीतिकाला स्वत: वेगळी ओळख तितकी बनवता आली नाही. तिने तमिळ इंडस्ट्रीतही काही काळ काम केलं.

या दरम्यान प्रीतिकाला काही अवॉर्ड्सही मिळाले. मात्र तरी तिला जास्त यश मिळालं नाही. २०१८ मध्ये तिला शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहिलं गेलं.

मात्र बऱ्याच काळापासून प्रीतिका छोट्या पडद्यावरुन गायब आहे. तिने आता करिअरची वेगळी वाट निवडली आहे. २०२२ मध्ये तिने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरु केलं. आता ती फुल टाईम कंटेंट क्रिएटर असून अनेक अध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्र संबंधित लोकांच्या मुलाखती घेते.

प्रीतिका अमृताहून ११ वर्षांनी लहान आहे. दोघी फार कमी वेळा एकत्र दिसल्या आहेत. अमृता तिच्या कुटुंबाविषयी कधीच फारसं बोलत नाही म्हणून ती बहिणीबद्दलही जास्त बोलताना दिसत नाही.