Amrita rao son veer first photo viral on social media rj anmol share son veer picture on instagram
PHOTOS: अमृता रावचा मुलगा वीरचा पहिला फोटो आला समोर, त्याच्या क्युट स्माईलवर नेटकरी झाले फिदा By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:00 PM2021-03-18T20:00:00+5:302021-03-18T20:00:03+5:30Join usJoin usNext विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. गेल्या 1 नोव्हेंबरला अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. (Photo Instagram) अनमोलने मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनमोलने शेअर केलेल्या फोटोत वीरला पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे. (Photo Instagram) वीर या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. आमचे जग... आमचा आनंद... असे त्याने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. (Photo Instagram) ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता आणि अनमोल अतिशय खाजगी आयुष्य जगणे पसंत करतात. (Photo Instagram) 2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता आणि अनमोल सात वर्षे डेट करत होते. अमृता आणि अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. (Photo Instagram) अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली. (Photo Instagram) टॅग्स :अमृता रावAmrita Rao