Ananya Panday : इटलीमध्ये पोहचली अभिनेत्री अनन्या पांडे, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 05:17 PM2024-06-20T17:17:03+5:302024-06-20T17:32:31+5:30

अभिनेत्री अनन्या पांडे हिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर एक चाहता वर्ग निर्माण केलाय.

अनन्या पांडे सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

सध्या अनन्या पांडे ईटलीमध्ये असून तिनं मिलान शहरातील काही फोटो शेअर केले आहेत.

अनन्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंना दिलेल्या कॅप्शमध्ये तिनं लिहलं, 'मला मिलानचं वातावरण खूप आवडलं'.

या फोटोमध्ये अनन्या ही स्वादिष्ट पिझ्झाचा आस्वाद घेताना दिसून येत आहे.

हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

काही दिवसांपुर्वीच अनन्याने 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं.

अनन्या पांडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिची 'Call Me Bae' ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ही सीरिज येत्या 6 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित केली जाणार आहे.