कोरोनाच्या भीतीमुळे अभिनेत्रीने तडकाफडकी सोडली मुंबई, लॉकडाऊन काळात दिल्लीला झाली रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 15:10 IST2021-05-01T14:58:06+5:302021-05-01T15:10:27+5:30
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सिनेमा मालिकांचेही शूटिंग बंद पडले. अशात सध्यातरी कलाकार पुन्हा एकदा घरातच बंदिस्त झाले आहेत.

राधिका मदाना कामा निमित्त मुंबईत राहते.
राधिका मुळची दिल्लीची आहे. तिथेच लहानाची मोठी झाली. तिचे कुटुंबिय दिल्लीत राहतात.
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून शूटिंगही बंद आहेत. त्यामुळे मुंबईत ती एकटीच पडली होती.
लॉकडाऊनमध्ये आता कामही नसल्यामुळे दिल्लीत कुटुंबासह काही वेळ निवांत घालवण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
नुकताच एअरपोर्टवर मुनवॉक करतानाचा एक व्हिडीओही तिने शेअर केला होता.
लॉकडाऊन काळात कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे बरीच कंटाळली होती.
घरात बंदिस्त असल्यामुळे कुटुंबाचीही तिला आठवण येत होती.
लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटी देखील कंटाळले आहेत.
कोरोनाची वाढती संख्या पाहता सेलिब्रेटी देखील मदतीसाठी मैदानात उतरले आहेत.
घरातच राहा, सुरक्षित राहा असे नागरिकांना आवाहनही करताना दिसत आहे.