‘जुदाई’तील श्रीदेवी व अनिल कुमारचा मुलगा रोमी आठवतो? आता दिसतो इतका हँडसम By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:00 AM 2023-10-31T08:00:00+5:30 2023-10-31T08:00:02+5:30
Judaai : अनिल कपूर, श्रीदेवीचा ‘जुदाई’ हा चित्रपट आठवतो ना? या चित्रपटातील रोमी सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवत असणार. त्याने श्रीदेवी व अनिल कपूरच्या मुलाची भूमिका साकारली होती... बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात बालकलाकार म्हणून केली आहे. आज आम्ही अशाच एका बालकलाकाराबद्दल सांगणार आहोत.
अनिल कपूर, श्रीदेवीचा ‘जुदाई’ हा चित्रपट आठवतो ना? या चित्रपटातील रोमी सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवत असणार. त्याने श्रीदेवी व अनिल कपूरच्या रोमी नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती.
रोमीची भूमिका करणाऱ्या या बालकलाकाराचं नाव होतं ओमकार कपूर. आज ओमकार त्याचा वाढदिवस साजरा करतोय. आज ओमकार कपूर काय करतो, कुठे आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे?
‘जुदाई’ चित्रपट 1997 ला रिलीज झाला होता आणि तुफान चालला होता. 1994 साली आलेल्या ‘सुभलग्नम’ या तेलगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. यातील रोमी अर्थात ओमकार आज 36 वर्षांचा झाला आहे.
‘जुदाई’आधी ओमकारने ‘मासूम’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. हा त्याचा पहिला सिनेमा होता.
‘मासूम’नंतर त्याला अनेक चित्रपटात बालकलाकार साकारण्याची संधी मिळाली. चाहत, हिरो नं. 1, जुडवा, मेला अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं.
मधल्या काळात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने संजय लीला भन्साळी, फराह खान यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरचं काम केलं. पण तिथे त्याचं मन रमेना. कारण त्याला हिरो बनायचं होतं.
हिरो बनायचंय हे मनाशी पक्क ठरवून हिरोच्या भूमिकेसाठी त्याने अनेक ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अखेर ‘प्यार का पंचनामा 2’ या हिंदी चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. या चित्रपटातून तो नायक बनून प्रेक्षकांसमोर आला.
ओमकार अलिकडेच ‘लावास्ते’ सिनेमात झळकला होता. याशिवाय तो सियासत, कौशिकी, भूतपूर्व, भ्रम, झुठा कहीं का अशा चित्रपटांत तो झळकला. मालिकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या.
बालपणी क्यूट व खोडकर वाटणारा ओमकार आता कमालीचा डॅशिंग दिसतो. त्याचा लुक पूर्णपणे बदलला आहे. तो कमालीचा हँडसम दिसतो.