Anil Kapoor's daughter rhea kapoor is far from limelight Tjl
लाइमलाइटपासून दूर राहते अनिल कपूरची छोटी मुलगी, मोठ्या बहिणीच्या आधीच करणार होती लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 11:39 AM2020-03-06T11:39:42+5:302020-03-06T11:48:03+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर ३३ वर्षांची झाली आहे. रियाचा जन्म ५ मार्च, १९८७ साली मुंबईत झाला होता. रिया बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माती म्हणून सक्रीय आहे. रियाने २०१० साली मोठी बहिण सोनम कपूर व अभय देओलचा चित्रपट आयशाची निर्मिती केली होती. याशिवाय तिने सोनम अभिनीत खुबसूरत आणि वीरे दी वेडिंगचीही निर्मिती केली आहे. रिया सोनमसारखी अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे ती लाइमलाइटपासून दूर असते. रिया निर्मातीसोबत एक फॅशन डिझायनरदेखील आहे. सोनम कपूरचे ड्रेस ती स्वतःच डिझाईन करते. तिचा फॅशन ब्रॅण्ड आहे रेहसन (Rheson). रियाचा बॉयफ्रेंड करण चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने आयशा व वेकअप सिड यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. करणने कित्येक चित्रपट व शोजचे दिग्दर्शन, प्रोडक्शन व डबिंगचे काम केले आहे. २०१३ साली वृत्त आले होते की रिया आणि करणचे लग्न सोनम कपूरच्या आधी होणार आहे. करणची फॅमिली यानिमित्ताने कपूर फॅमिलीला भेटण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आले होते याशिवाय असेही वृत्त आले होते की डिसेंबर २०१३ साली त्यांचे लग्न फिक्स झाले आहे. मात्र काही कारणांमुळे ते झालं नाही. रियापेक्षा आणखीन एक लहान भाऊ आहे. त्याचे नाव आहे हर्षवर्धन कपूर. ज्याने मिर्झिया सिनेमातून करियरला सुरूवात केली.टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूरAnil KapoorSonam Kapoor