पतीसोबत आलिशान घरात राहेत अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:00 AM2022-07-08T07:00:00+5:302022-07-08T07:00:07+5:30

रिया कपूरचं घर एखाद्या महालप्रमाणे प्रशस्त आहे. रिया इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक दाखवत असते.

अनिल कपूरने आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. सोनम कपूरनंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच त्याने आपली धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) चं लग्न लावून दिलं. (Photo Instagram)

रिया करण बुलानी (Karan Boolani) सोबत विवाह बंधनात अडकली. 12 वर्षांच्या नात्याला नवे नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केले. (Photo Instagram)

रियाने आयशा आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे. रिया आणि सोनम कपूर यांनी एकत्र येऊन Rheson नामक फॉशन ब्रॅण्ड स्थापित केला आहे.(Photo Instagram)

रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवत असते. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.(Photo Instagram)

रियाने हे घरं भाड्याने घेतलं आहे. (Photo Instagram)

रिया कपूर आणि करण बुलानी यांनी मुंबईत स्वतःचा आलिशान आशियाना बनवला आहे. रियाने तिच्या घराची ही छायाचित्रे एका मासिकासाठी काढली आहेत. (Photo Instagram)

वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी रियाने हे फोटोशूट केलं होतं. (Photo Instagram)

करण एक फिल्ममेकर असून त्याने आजतागयत ५०० जाहिराती तयार केल्या आहेत. आयशा आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात करण बूलानीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.(Photo Instagram)